Premium

मुजोर दुकानदाराला ग्राहकाने शिकवला धडा! तीन रुपये परत करण्यास दिला नकार, आता द्यावा लागणार २५ हजारांचा दंड

जागो ग्राहक जागो हे स्लोगन आपण लहानपणापासून ऐकत आलोय. तरीही खूप कमी ग्राहक आपल्या अधिकाऱ्यांबद्दल जागरुक नसल्याचे दिसते. पण ओडिशामधील एक जागरुक ग्राहकाने दुकानदाराच्या मुजोराविरोधात आपल्या अधिकारांची माहिती घेत थेट कोर्टात धाव घेत न्याय मिळवला.

jago grahak jago sambalpur xerox shop owner fined 25000 rupees for not returning 3 rupees after photocopy in odisha
मुजोर दुकानदाराला ग्राहकाने शिकवला धडा! तीन रुपये परत न करण्यास दिला नकार, आता द्यावा लागणार २५ हजारांचा दंड ( photo – indian express)

जेव्हा दुकानातून आपण काही वस्तू खरेदी करतो, तेव्हा दुकानदार सुट्टे पैसे देण्यास चिडचिड करतात. काही दुकानदार यावेळी सुट्ट्या पैश्यांऐवजी चॉकलेट देतात, तर काही सरळ सुट्टे पैसे परत देण्यास नकार देतात. अशाप्रकारे अनेक मुजोर दुकानदार सुट्टे पैशांच्या नावाखाली अनेक ग्राहकांची लूट करताना दिसतात. असेच एक प्रकरण ओडिशामधून समोर आले आहे, जे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला यापुढे दुकानदाराकडून तुमचे सुट्टे पैसे मागण्याची भीती किंवा लाज वाटणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक ग्राहक फोटोकॉपी काढण्यासाठी संबळपूरला गेला होता. यावेळी एका कॉपीसाठी त्याला दोन रुपये खर्च आला म्हणून त्याने दुकानदाराला पाच रुपये दिले. मात्र, उरलेले तीन रुपये मागितल्यावर दुकानदार त्याच्याशी उद्धटपणे बोलला. यावेळी ग्राहकाने सर्व गोष्टी ऐकून घेत नंतर दुकानदाराविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने दुकानदाराला २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jago grahak jago sambalpur xerox shop owner fined 25000 rupees for not returning 3 rupees after photocopy in odisha sjr

First published on: 29-09-2023 at 17:31 IST
Next Story
अनाथांचा नाथ एकनाथ! गणेशोत्सवात छोट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा; पाहा video