Jaipur Girl Breaks Bullet Viral Video: Viral footage shows aggressive road rage in Jaipur after a minor accident : सध्या जयपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एका तरुणी किरकोळ अपघातानंतर एका दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोप केला जात आहे. एनडीटीव्हीने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ गोदाम पुलिया या गर्दीच्या परिसरात घडल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, रस्ता ओलांडताना त्या तरुणीची स्कुटी आणि एका रॉयल एनफील्ड बुलेटचा किरकोळ अपघात झाला. या लहानशा अपघाताचे रूपांतर काहीच वेळात जोरदार वादात झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला दगडाने मोटारसायकलचे नुकसान करताना दिसत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, घटनास्थळी अनेक लोक उभे आहेत, ज्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र या घटनेदरम्यान त्या तरूणाला रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
व्हिडिओमध्ये ती महिला असेही म्हणताना ऐकू येते की, “जा, पोलिसांना बोलाव, काही फरक पडत नाही. कोणत्याही पोलीसाला बोलाव, तू काहीच करू शकणार नाहीस.”
हे प्रकरण नंतर सोडाला पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे अधिकाऱ्यांनी दोघांनाही समज दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद मिटवण्यात आला आहे आणि त्या महिलेविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार किंवा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे वृ्त्त एनडीटीव्हीने दिले आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची वागणूक, जबाबदारी निश्चित करणे आणि अशा परिस्थितीत पोलिसांकडून मिळाणारा प्रतिसाद यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते अशा वर्तनाला आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी करत आहेत.
