OMG! उकळत्या तेलात हात घालून हा बनवतो फ्राइड चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIRAL VIDEO

नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत खमंग फराळ बनवता बनवता नाही नऊ येतात. विचार करा, जर उकळत्या तेलात हात बुडवून एखादा पदार्थ करायचा असेल तर….होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

jaipur-vendor-viral-video
(Photo: Instagram/ nonvegfoodie)

नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत बनवलेले लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे खाऊन तोंडाला काहीतरी वेगळी चव पाहिजे असं प्रत्येकालाच वाटू लागतं. तळलेले हे पदार्थ खायला जितकी मजा येते तितकंच बनवण्याचा कंटाळा. उकळत्या तेलात फराळ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी वाटू लागते. त्या गरम तेलाच्या कढईसमोर उभं राहणंही अगदी नकोसं वाटतं. मग विचार करा, जर एखादी व्यक्ती कढईतल्या उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर… साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्हाला विश्वास होत नसेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

कढईत उकळत्या तेलात हात बुडवून फ्राइड चिकन बनवणाऱ्या एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरी मंडळी हैराण झालीय. जयपूरमधील फूड ब्लॉगर शैलेश याने या विक्रेत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि तो ‘nonvegfoodie’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला. साऱ्यांनाच थक्क करून सोडणाऱ्या या व्हिडीओला सोशल मीडियावर २ मिलियनपेक्षाही जा्स्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरमधला असून रस्त्याच्याकडेला असलेल्या अली चिकन सेंटर नावाचं फूड स्टॉल आहे. या स्टॉलवरील एक विक्रेता चक्क त्याच्या उघड्या हाताने उकळत्या तेलात चिकन तळताना दिसून येतोय. कढईतलं तेल गरम आहे, हे समजतंय कारण त्यातून बुडबुडे येत आहेत. या व्हिडीओमधील विक्रेता सुरूवातीला मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे गरम तेलात टाकतो. त्यानंतर थोड्या वेळाने चिकन शिजल्यावर कढईत उकळत्या तेलात हात बुडवून फ्राइड चिकन बाहेर काढतो आणि वेगळ्या डब्यात ठेवतो. या फ्राइड चिकनवर मसाले लावून तो लोकांना सर्व्ह करतो. एरवी आपण हाताने तेलात पदार्थ सोडल्यानंतर तो तळण्यासाठी चिमटा किंवा चमच्याचा वापर करतो. मात्र हा विक्रेता आपल्या हाताच्या बोटांनी तेलात सोडलेले पदार्थ तळतो आहे.

आपल्याला व्हिडीओ पाहूनही फक्त तुम्हालाच नाही तर तिथं प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या लोकांनाही यावर विश्वास बसत नाही. हा विक्रेता कढईतल्या गरम तेलात हातातची बोटं सुद्धा बुडवतो. या तेलात हात घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलत नाही, ज्यावरून त्याला चटके बसत असावेत, असं दिसेल. शिवाय त्याच्या हातांवरही काही भाजल्याच्या खुणा दिसत नाहीत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अभी ना जाओ छोड कर पर…; बाप-लेकीचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे हे काय! हायवेवरील वाहतूकीवर नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्हीवर जेव्हा पोपट डोळे मोठे करून पाहतो…

हा व्हिडीओला आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय. तर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. नेटिझन्सनी विक्रेत्याच्या कलेला दाद दिली आहे. आपण असं याआधी कधीच पाहिलं नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर एका युझरने कदाचित त्याच्या हातावरील बॅटरमुळे तिला चटके जाणवत नसावेत, असं म्हटलं आहे. “याचे हात भाजत नाहीत का?”, “उकळत्या गरम तेलात हात टाकून बाहेर काढले फ्राईड चिकन” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. तर काही जणांनी या विक्रेत्याचे हात भाजत नाही यामागची कारणं सांगत कमेंट्स शेअर केल्या आहेत.

या विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विक्रेत्याची बरीच चर्चा सुरूय. अनेकांनी तर हा व्हिडीओ पाहून त्याच्या स्टॉलवर प्रत्यक्ष कलाकारी पाहण्यासाठी एकच गर्दी केलीय. उकळत्या तेलात उघड्या हाताने चिकन फ्राय करणं हे त्याचं दररोजचंच काम बनलं असल्याने यात त्याला विशेष काही वाटत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jaipur street food vendor dips his hand in boiling hot oil while making fried chicken shocking viral video prp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या