Accident Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना अनेकजण मोबाईलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार समोर आलाय. जळगावमधील डॉक्टरांचा हा मध्यरात्री घडलेला अपघात पाहून तुमचाही थरकाप उडेल. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्याने अपघात होतात आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जळगावमधील एका ठिकाणी रात्रीच्या वेळी एक डॉक्टर हातात मोबाईल, कानात हेडफोन टाकून तो मग्न होऊन चालत होते. यावेळी रस्ता ओलांडतानाही त्यांनी आजूबाजूला लक्ष दिलं नाही. रात्रीचा रिकामा रस्ता असल्यानं गाड्याही वेगात असतात. अशातच रस्ता ओलांडताना भरधाव वेगात एका कार येते आणि डॉक्टरांना उडवते. यावेळी हे डॉक्टर स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही त्यांचा अपघात होतो. व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कधी अश्लील भाषा तर कधी चुकीचा स्पर्श; शाळेबाहेर छेड काढणाऱ्याला तरुणीने मास्टरमाईंडने पकडलं, VIDEO पाहाच

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. jalgaon_mirrorनावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon accident major accident car hit man shocking accident video viral srk
First published on: 13-05-2024 at 09:55 IST