ह्रदयद्रावक ! शहीद जवानाच्या मुलाला उचलून घेताच अधिकाऱ्याला अश्रू अनावर

दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जम्मू काश्मीरमधील एक पोलीस जवान शहीद झाला

दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जम्मू काश्मीरमधील एक पोलीस जवान शहीद झाला आहे. सोमवारी श्रीनगरमध्ये जवानाच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन फोटो शेअर केले आहेत जे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या फोटोत पोलीस अधिकाऱ्याने शहीद जवानाच्या मुलाला हातात उचलून घेतलं असून, डोळ्यातून सतत पाणी वाहत आहे.

फोटोंमध्ये दिसणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव हसीब मुघल असून ते श्रीनगरचे एसएसपी आहेत. आपल्या सहकारी जवान अर्शद खान यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली देताना त्यांनी त्याच्या मुलाला उचलून घेतलं होतं. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यपालांचे सल्लागार, लष्कर, पोलीस अधिकारी, खान यांचे कुटुंबीय आणि सहकारी उपस्थित होते.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अर्शद खान जखमी झाले होते. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं. एम्समध्ये उपचार करण्यासाठी त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं होतं.

बुधवारी दहशतवाद्यांनी अनंतनाग येथे सीआऱपीएफ ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच सीआरपीएफ जवान शहीद झाले. अर्शद यांच्या मृत्यूसहित हा आकडा सहावर पोहोचला आहे. खान यांच्या मागे त्यांचे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jammu kashmir police martyr arshad khan ssp hasib mughal gets emotional photo viral sgy

ताज्या बातम्या