Jantar Mantar Protest Fact Check Of Viral Video : १० ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवारी हजारो लोक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनासाठी एकत्र येणार होते. दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या या आंदोलनात हजारो लोक सहभागी होणार होते; पण, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सुरक्षा दलांनी तो परिसर सील केला होता. आंदोलन हाणून पाडण्यासाठी नवी दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. ‘लाइटहाऊस जर्नालिझम’ (Lighthouse Journalism)ला यादरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सापडले, ज्यांच्याबद्दल दावा केला जात आहे की, ते याच आंदोलनातील आहेत. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हे व्हिडीओ जुने आणि असंबंधित आहेत.
व्हिडीओ १
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @RamaGanapa36231 ने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आणि दावा केला की, तो या आंदोलनातील आहे.
इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
व्हिडीओ २
एक्स (ट्विटर) युजर @king7851007 यांनी हा व्हायरल व्हिडीओ या दाव्यासह शेअर केला की, हा व्हिडीओ नवी दिल्लीतील आणि अलीकडील आहे.
इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
व्हिडीओ ३
एक्स (ट्विटर) युजर ‘पीएमएफ न्यूज’ (PMF News) यांनी एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले की, ही दृश्यं सीजेपी (CJP) आंदोलनातील आहेत.
https://twitter.com/PMFNEWS/status/2108766205867880920
इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास
व्हिडीओ १
आम्ही प्रथम व्हायरल व्हिडीओमधून की-फ्रेम्स (keyframes) काढल्या आणि रिव्हर्स इमेज सर्च केली, ज्यामुळे आम्हाला टिकटॉकवर अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला, ज्यामध्ये आम्ही व्हीपीएन (VPN) वापरून प्रवेश केला.
आम्ही व्हिडीओ झूम इन केला, तिथे एका दुकानाचे बोर्ड होते, ज्यावर “शॅन गॅझेट” (Shann Gadget) असे लिहिले होते. आम्हाला एक बॅनरही सापडला, ज्यावर “डियांदी फेस्टिव्हल सा इलिगन” (Diyandi Festival sa Ilpan) असे लिहिले होते. आम्ही या शब्दांचा शोध घेतला.
आम्हाला आढळले की, ‘डियांदी फेस्टिव्हल सा इलिगन’ हा फिलीपिन्समधील लाणाओ डेल नॉर्टे प्रांतातील इलिगन शहरात दरवर्षी सप्टेंबरमध्ये साजरा होणारा व महिनाभर चालणारा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. शहराचे संरक्षक संत सेंट मायकेल द आर्कएन्जल (सॅन मिगुएल) यांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो.
त्यानंतर आम्ही ‘शॅन गॅझेट’साठी गूगल मॅप्सवर त्या ठिकाणाचा शोध घेतला.
आम्हाला तो नेमका पत्ता सापडला, जिथे व्हिडीओ शूट करण्यात आला होता. त्यामुळे हा व्हिडीओ नवी दिल्लीचा नसून, फिलीपिन्सचा आहे, असे स्पष्ट झाले.
व्हिडीओ २
व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या दृश्यांवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपासाला सुरुवात केली.
२०२१ मधील शेतकरी आंदोलनाबाबतच्या एका अहवालात आम्हाला अशीच दृश्ये आढळली.
https://www.firstpost.com/india/farmers-storm-red-fort-in-huge-tractor-rally-violence-vandalism-in-delhi-streets-kills-one-injure-86-cops-over-1000-agrarians-9241821.html
आम्हाला असेच इतर अहवाल सापडले, ज्यावरून समजते की, हा व्हायरल व्हिडीओ शेतकरी आंदोलनातील आहे.
https://apnews.com/article/india-farmer-protest-654ef151a8af6de8c264c29363d0607b
व्हिडीओ ३
व्हिडीओमधून मिळवलेल्या की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपासाला सुरुवात केली.
आम्हाला हाच व्हिडीओ २० जुलै २०२६ रोजी अपलोड केला गेल्याचे आढळले.
https://www.facebook.com/reel/1566193548192063
दिल्ली पोलिसांनीही एका युजरच्या व्हिडीओवर कमेंट करीत हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे हे लक्षात येते की, एका जुन्या व्हिडीओचा वापर सीजेपी आंदोलनातील अलीकडील व्हिडीओ म्हणून केला जात होता.
निष्कर्ष
१० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सीजेपी (CJP) आंदोलनाचा संदर्भ देऊन जुने आणि असंबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असून, व्हायरल झालेली दृश्ये एक तर जुनी आहेत किंवा चालू घटनेशी संबंधित नाहीत.
