scorecardresearch

Premium

Video: पंतप्रधान मोदींना पाणीपुरी खाताना पाहून, जपानी राजदूतांनीही धरला हट्ट, अन्…

PM Modi: जपानच्या राजदूतांनी मोदींना पाणीपुरी खाताना पाहिलं आणि त्यांनाही राहवलं नाही. त्यानंतर त्यांनी जे केलं ते थक्क करणारं आहे.

Japanese ambassador hiroshi suzuki eat paanipuri
जपानी राजदूतांनी घेतला पाणीपुरीचा आनंद

पाणीपुरी हे नुसते नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी आवडत नाही असा खवय्या मिळणं तसं दुर्मीळच. पाणीपुरी, गुपचूप, गोलगप्पे अशा विविध नावाने ओळखला जाणारे पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही काय अगदी बडे बडे नेतेही पाणीपुरी खाण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाणीपुरी खाल्ली होती. जपानच्या राजदूतांनी मोदींना पाणीपुरी खाताना पाहिलं आणि त्यांनाही राहवलं नाही. त्यानंतर त्यांनी जे केलं ते थक्क करणारं आहे. याचा व्हिडीओही त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतला होता. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी पाहिले आणि त्यांनाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता ते पुरेपूर पणीपुरीचा आनंद घेत आहेत. तसेत आणखी काही चाट सुद्धा त्यांनी ट्राय केले आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त

हिरोशी सुझुकीने ट्विटमध्ये म्हणाले, जेव्हापासून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान किशिदा यांना एकत्र गोलगप्प्यांचा आनंद घेताना पाहिले तेव्हापासून मलाही त्याचा आनंद घ्यावासा वाटत होता. काशीमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी सर्व भारतीयांचे आभारही मानले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Japanese ambassador hiroshi suzuki eat paanipuri in uttar pradesh varanasi aftersee pm modi eat golgappa with japan pm fumio kishida srk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×