‘प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढू नका’, ‘प्रवाशांनी रेल्वे टपावरून प्रवास करू नका’, ‘रेल्वे फलाटावर कचरा टाकू नका’,  ‘विनातिकिट रेल्वेने प्रवास करू नका’ अशा एक ना दोन कितीतरी सूचना नेहमी रेल्वे प्रवाशांना दिल्या जातात. आता या सूचनांमध्ये ‘महिलांनी कृपया चालत्या रेल्वेमध्ये मेकअप करू नये अशी सूचना कानावर आली तर…? आश्चर्य वाटून घेऊन नका आपल्या येथे सुदैवाने अशी सूचना अद्यापही दिली गेली नाही. पण जपानच्या अनेक रेल्वे कंपन्यांनी मात्र अशाप्रकारची सूचना देणारा एका व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओवर जपानच काय पण जगभरातून टीका होत आहे.

जपानच्या रेल्वे कंपन्यांनी प्रवाशांनी  प्रवासात कसे वागावे हे सांगणारी मोहिम सुरु केली. या मोहिमेअंर्तगत अनेक व्हिडिओ बनवून त्याची जाहिरात सुरू करण्यात आली. रेल्वेत चढताना मोबाईलमध्ये लक्ष देऊ नये, सहप्रवाश्यांशी कसे वागावे असे अनेक जगजागृती करणारे व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केले. या व्हिडिओंपैकी हा एक आहे. जपानी महिला रेल्वे प्रवासात तयार होतात. या व्हिडिओमध्ये त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘जपानी महिला या खूपच सुंदर दिसतात पण अधिक सुंदर दिसावे यासाठी रेल्वेमध्ये मेकअप करण्याची गरज नाही. कदाचित असे केल्याने त्या कुरूप दिसतील’ अशा प्रकाराची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमुळे जपानी महिला कामालीच्या नाराज झाल्या आहेत. काम आणि घर संभाळण्याच्या नादात महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळे प्रवासातील वेळ हा त्या स्वत:साठी देतात असे महिलांचे म्हणणे आहे, त्यामुळे अशा प्रकारे जाहिरात करणे हे अपमानास्पद असल्याने अनेक महिलांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.

Story img Loader