सात ऑगस्टपासून जेव्हा त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले तेव्हापासून भारतीयांच्याओठांवर फक्त एकच नाव आहे – नीरज चोप्रा. नीरज चोप्राने तेव्हा गोल्डन कामगिरी करत एक इतिहास रचला. त्याने भारताचे पहिले सुवर्ण पदक मिळवले परंतु त्या दिवसापासून त्याला माध्यमांमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत. ज्यावर त्याने कडक उत्तरं देत सगळ्या चाहत्यांना खुश केलं. आता त्याने आपल्या चाहत्यांसाठी अजून एक खास गोष्ट केली आहे. नीरजने त्याची एक जाहिरात पोस्ट करत जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. ही जाहिरात विनोदी आहे आणि नीरजचा अभिनय बघून चाहते त्याची अजूनच वाहवा करत आहेत.

नीरज चोप्राने आता त्याच्या अभिनय कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले कारण त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची २०२१ एडिशन पुन्हा सुरू होण्यापूर्वी क्रेडिट कार्ड बिल पेमेंट अॅप, क्रेडच्या नवीनतम जाहिरातीत आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. आयपीएलच्या प्रायोजकांपैकी एक असलेल्या क्रेडिटची विनोदी आणि आनंदी जाहिरातीने त्याने सर्वांना प्रभावित केले. नीरज चोप्राने यात सर्व मीम्स, विनोद आणि प्रश्नांवर आपलं उत्तर दिलं आहे जे त्याला सुवर्णपदक जिंकल्यापासून प्रसारमाध्यमांनी विचारले होते.

(हे ही वाचा: विकृत! कामगारांनी टोस्टवर घाणेरडे पाय ठेवले अन् पॅक करण्यापूर्वी चाटले; पहा व्हायरल व्हिडीओ)

या ब्रँडने राहुल द्रविडची देखील जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यात बंगळुरूच्या वाहतुकीदरम्यान आपला राग व्यक्त केला होता, तर भारताच्या ९० च्या दशकातील आणखी तीन क्रिकेटपटूंना बॉय बँडमध्ये दाखवले होते. या जाहिरातीमध्ये नीरज मीडिया पर्सन, कॉर्पोरेट सीईओ, बँक मॅनेजर, बॉलिवूड निर्माता असं बनून हास्यास्पद संवाद बोलताना आणि विनोदी चित्रपटाची नावे देत प्रश्न विचारताना दिसतोय – ‘नीरज हुआ मधम’, ‘जैवलिन – एक प्रेम कथा’ त्याच्या कथित बायोपिकसाठी त्याने ही नावे जाहिरातीत घेतली आहेत.

पहा जाहिरात:

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

आयपीएलची १४ वी एडिशन रविवार, १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यासह पुन्हा सुरू झाली.

तुम्हाला कशी वाटली गोल्डन बॉय नीरजची ही जाहिरात?