जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर, यांनी काही दिवसांपुर्वीच व्होडाफोन आणि आयडियाच्या सेवेबाबचा त्यांचा खराब अनुभव शेअर केला होता त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. अशातच आता त्यांनी आणखी एक नवीन ट्विट केलं आहे. ज्यामुळे नेटकरी त्यांच्यावर भडकले असून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कारण कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतातील पायाभूत सुविधांची दुबईशी तुलना केली आहे. शिवाय भारतातील मेट्रो स्टेशन कलाहीन असल्याचं म्हटलं आहे.

शनिवारी, कपूर यांनी भारतामधील काही शहरांतील मेट्रो बांधकामाबद्दलचे मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, “बंगळुरू, गुडगाव, कोलकाता… आमची ओव्हरग्राउंड/ओव्हरहेड काँक्रीटची मेट्रो स्टेशन्स कलाहीन आहेत? डावीकडील बंगळुरूच्या तुलनेत उजवीकडील दुबईचे स्टेशन पाहा, दुबईचे हे स्टेशन १० वर्षांपूर्वी बांधलेले असावे. ! (sic)”

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
Mumbai local Women Passengers Hardly Wears Clothes Like Shirt Suits
“मुंबई लोकलमध्ये किती बायका असे कपडे घालून चढतात, उगाच..”, ‘लंडन की लाली’ने उघडले डोळे, पाहा Video
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

हेही पाहा- Video: उंच डोंगरावरुन गवताच्या पेंड्या क्षणात पोहोचवल्या घरात; शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही कौतुक कराल

त्यांनी हे ट्विट बहुप्रतिक्षित व्हाईटफील्ड-केआर पुरम मेट्रो मार्गाचे (पर्पल लाईन) उद्घाटन होण्याची शक्यता असतानाच केले आहे. तर संजीव कपूर यांनी देशाच्या विकास प्रकल्पांवर टीका करून परदेशी राष्ट्रांतील प्रकल्पांचे कौतुक केल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. शिवाय अनेकांनी त्यांना बाहेरच्या देशातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या त्यांचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने कपूर यांना उत्तर दिले आहे, “तुम्ही दुबईत जाऊन राहा” तर आणखी एकाने स्वतःच्या देशाची कदर नसणाऱ्यांचे हे मतं असल्याचं एकाने म्हटलं आहे. शिवाय अनेकांनी त्यांच्या या ट्विटचा निषेध केला आहे.

हेही पाहा- जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या

शिवाय, देशभरातील अनेक मेट्रो स्टेशन्स किती सौंदर्यपूर्ण आणि चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली आहेत याबद्दलचे फोटो लोकांनी कपूर यांच्या ट्विटच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत. शिवाय त्यांनी कलाहीन भारतीय रेल्वे स्टेशन म्हटलंमुळे आम्ही त्यांना देशातील उत्तम कलाकृतीचे फोटो पाठवत असल्याचंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.