गरिबीमुळे अन्नावाचून ८९ वर्षे जिवंत राहिले हे वृद्ध

मातीची ढेकळ खाण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता

कारू आता १०० वर्षांचे आहेत. (छाया सौजन्य : ANI )

आपल्या देशात किती विरोधाभास आहे. एकीकडे सर्वाधिक अन्नाची नासाडी करणाऱ्या देशात आपल्या देशाचंही नाव आहे तर दुसरीकडे उपासमारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. गेल्या वर्षभरात झारखंडमध्ये उपासमारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या समोर आल्यानंतर मोठा वाद झाला. तर दुसरीकडे याच राज्यात एक अजब गजब प्रकरण समोर आलं आहे.

गरिबीमुळे येथे राहणारे कारू पासवान यांच्यावर शेतातली माती खाऊन उदरनिर्वाह करण्याची वेळ आली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कारू माती खाऊनच आपलं पोट भरत होते. दिवसेंदिवस जगणं मुश्किल होत असल्यानं वयाच्या ११ वर्षांपासून जगण्यासाठी समोर जे मिळालं ते खाऊन त्यांनी आपली भूक भागवली. पुढे माती खाऊन पोट भरण्याची त्यांना इतकी सवय लागली की आता जर माती खाल्लीच नाही तर मी जिवंत राहू शकत नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कारू आता १०० वर्षांचे आहेत. गेल्या ८९ वर्षांपासून ते केवळ मातीच खात आहेत.

Yabba dabba doo! गर्भश्रीमंत सुलतानाला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली ‘फ्लिंटस्टोन कार’

‘या’ नेलपेंटच्या किमतीत एक आलिशान गाडी येईल

गेल्या आठ दशकात त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली, पण लहानपणी पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना जी सवय लागली ती मात्र अजूनही कायम आहे. त्यांच्याजवळ नेहमीच मातीचं मध्यम आकाराचं मडकं असतं या मडक्यात सुक्या मातीची ढेकळ भरुन ठेवतात आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा ती खातात. त्यांच्या या सवयीमुळे घरातलेच नाही तर गावकरीही अचंबित झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jharkhand man survive eating mud from last 89 years