jharkhand viral news woman sacrifices goat for dogs safety | Loksatta

पाळीव कुत्र्याच्या दिर्घायुष्यासाठी भलता नवस, सुरक्षेसाठी बकऱ्याचा बळी

कुत्र्याच्या सुरक्षेसाठी एका बकऱ्याचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

पाळीव कुत्र्याच्या दिर्घायुष्यासाठी भलता नवस, सुरक्षेसाठी बकऱ्याचा बळी
एका महिलेने रस्त्यावरील कुत्र्याला घरी आणलं आणि त्याचा घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला, पण… (Photo : Indian Express)

घरामध्ये कुत्रा पाळणं ही काही नवीन गोष्ट नाही, मात्र नवीन जमान्यातील कुत्र्यांची मौज काही वेगळी असते. अनेकदा तुम्ही रस्त्याने जाताना पाळीव कुत्र्यांना आलिशान गाड्यांमधून फिरताना पाहिलं असेल. शिवाय या कुत्र्यांच्या देखभालीसाठी त्यांचा मालक त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात. अनेक लोकं पाळीव कुत्र्यांना आपल्या घरातील सदस्य मानतात.

मात्र, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचं जीवन पाळीव कुत्र्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतं. एकीकडे पाळीव कुत्र्यांना गाडीतून फिरवलं जात तर दुसरीकडे भटक्या कुत्री वाहनांखाली येऊन मरावं लागतं. मात्र, झारखंडमधील धनबाद येथील एका महिलेने रस्त्यावरील कुत्र्याला घरी आणलं त्याचा आपल्या घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला. पण या महिलेने कुत्र्याच्या सुरक्षेसाठी एका बकऱ्याचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

हेही वाचा- चक्क माशांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त, गावात कोणी पोरगी द्यायला धजेना त्यामुळे अविवाहित त्रस्त

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबाद येथे लोयाबाद २० नंबर भागात राहणाऱ्या सुमित्रा कुमारी नावाच्या महिलेने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस एखाद्या सेलेब्रिटी सारखा साजरा केला आहे. या महिलेने कुत्र्याच्या वाढदिवसाला लोकांना आमंत्रित करण्यासाठी आमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. कुत्र्याच्या वाढदिवसाची ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

सुमित्रा कुमारी यांनी 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. सुमित्रा यांनी त्याच्या वाढदिवसाठी ३०० पेक्षा जास्त लोकांना आमंत्रित केलं होतं. सुमित्रा कुमारी यांनी कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं नियोजन केलं होतं. शिवाय त्यांनी गांधीग्राममधील रूग्णांना फळे देखील वाटली. सुमित्रा यांनी सांगितलं की, त्या मागील वर्षी २९ नोव्हेंबर रोजी कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेल्या असता त्यांना रस्त्यात एक कुत्रा आणि तिची ३ पिल्ले मरुन पडल्याचे दिसलं तर त्याच्या शेजारी एक जीवंत कुत्र्याचं पिल्लू थरथरत उभं होतं. सुमित्रा यांनी त्या रस्त्यावरील कुत्र्याला घरी आणलं आणि त्यांला चांगलं वाढवलं देखील.

हेही वाचा- पुस्तक देण्याच्या बहाण्याने गेली ती परतलीच नाही, माहेरी आलेली तरुणी प्रियकरासोबत पळाली

मात्र, त्यांनी या कुत्र्याच्या पिल्लाच्या सुरक्षेसाठी काली मातेच्या मंदिरात बोकडाचा बळी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. या कृतीमुळं सुमित्रा ह्या चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत. तर काही लोकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. एकाचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याचा जीव घेणं योग्य नसल्याचं काही लोकं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:23 IST
Next Story
Video: जर इच्छा असेल तर माझ्या बेडवर..उर्फी जावेद अतिउत्साहात बोलून गेली आणि मग जे झालं…