scorecardresearch

मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

brother in law, sister in law,
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लग्न म्हटलं की एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडीओ किंवा मग धमाल गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवरदेव आणि त्याच्या मेहुणीचा आहे. आपण मेहुणीला नवरदेवाचे बूट चोरताना पाहतो. पण या व्हिडीओत मेहुणी बुट चोरताना दिसली नाही. तर त्यांचा फोटो काढतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मंचावर वधू-वर आपापल्या जागेवर बसल्याचे दिसते. त्यानंतर वधूची बहीण स्टेजवर चढते आणि फोटो काढू लागते. नवरदेव आणि नवरीच्यामध्ये बसून ती फोटो काढत असते. ती जेव्हा स्टेजवरून खाली उतरतण्यासाठी उठते तेव्हा नवरदेव तिचा हात पकडतो आणि तिला चिट्ठी देतो असे अनेकांचे म्हणणे आहे. नवरदेवाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नवरीला मात्र या प्रकाराबाबत काहीच कल्पना नसल्याचे दिसून येते.

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

आणखी वाचा : “माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

हा व्हिडिओ only._.sarcasm नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘आता बिचारा पत्नीला सॉरी बोलत असेल, या सारख्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jija sali ka video brother in law and sister in law video bride groom video dulha dulhan ka video google trends dcp

ताज्या बातम्या