सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज विविध घटना आपल्या समोर येत असतात. आता असाच एक सर्वांना हालवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या एका जिज्ञासू घटनेत, एका व्यक्तीने व्हिडीओ शेअरिंग YouTube च्या विरोधात याचिका दाखल करून ७५,००० रुपये भरपाईची मागणी केली असून त्याने YouTube वर त्याचे परीक्षेत लक्ष विचलित केल्याचा आणि नोकरीच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्याचा ठपका ठेवला आहे.

YouTube वर आरोप करण्याचे कारण काय?

आनंद किशोर चौधरी म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांनी सुप्रीम कोर्टात दावा केला की, YouTube जाहिरातींवरील सेक्सी व्हिडीओने कथितरित्या त्याचे लक्ष विचलित केले त्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले व ते परीक्षेच अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून यूट्यूबकडून ७५,००० रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणी केली.

(हे ही वाचा : झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल)

न्यायालयाने फेटाळली याचिका

आनंद किशोर चौधरी यांनी YouTube प्लॅटफॉर्म विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यू ट्युबवर अनेक सेक्सी व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ माणसाच्या मनावर परिणाम करतात आणि त्याला विचलीत करतात असे चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि वेळ वाया घालविणारी याचिका ठरवत सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांची याचिका फेटाळली. तसेच न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत त्याच्यावर दंडही ठोठावला.

सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला याचिकाकर्त्यावर दंड

न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले की, जे यूट्युब व्हिडीओ बघितल्याचे आपण सांगता त्या व्हिडीओत काय आहे याची माहिती यू ट्युबने व्हिडीओ बघण्याआधीच वाचण्याची सोय करून दिली आहे. हे वाचूनही आपण व्हिडीओ बघितला आहे, त्यामुळे यात दोष तुमचाच आहे. अशी नोंद सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली. ही वेळ वाया घालविणारी याचिका ठरवत सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांची याचिका फेटाळून लावली व न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याप्रकरणी त्याच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. परंतु याचिकाकर्त्याने नम्रतेची विनंती केली आणि दंडाची रक्कम २५ हजार रुपये करण्यात आली.