Jodhapur Ward Boy Viral Video : राजस्थानमधील जोधपूरमधल्या रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉर्डबॉयने चक्क एका रुग्णाची ECG चाचणी केली आहे. टेक्निशियन दिवाळीच्या रजेवर होता तसेच रुग्णालयात एकही डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी वॉर्डबॉयने यूट्यूब व्हिडीओ पाहून रुग्णाची ECG चाचणी केली. यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांनी वार्डबॉयचा ईसीजी तपासतानाचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

गुरुवारी (३१ ऑक्टोबर) जोधपूरच्या सॅटेलाइट रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी पोहोचला असताना ही घटना घडली. व्हिडीओ समोर आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. जोधा यांनी, चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. या घटनेशी संबंधित दोन वेगवेगळे व्हिडीओ समोर आले आहेत. एक व्हिडीओ रुग्णाने स्वत: आणि दुसरा त्याच्याबरोबर असलेल्या कुटुंबीयांनी बनवला होता.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Raj Thackeray on Viral Video
Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हा व्हिडीओ दिवाळीच्या दिवसांतील आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण रुग्णालयामध्ये खाटेवर झोपलेला दिसत आहे. तो वॉर्डबॉय लॅब टेक्निशियन दिवाळीला रजेवर असल्याचे सांगतोय. त्याला मशीन कसे हाताळायचे ते माहीत नाही? त्यानंतर पहिला व्हिडीओ पूर्ण होतो. दुसऱ्या व्हिडीओमध्ये रुग्णाचे कुटुंबीय म्हणतात की, भाऊ, तू म्हणतोस की, तू कधीच ईसीजी केलेला नाहीस. मग रुग्णाच्या जीवाशी का खेळत आहेस? घरातील सदस्य त्याला वारंवार सांगतात की, भाऊ, कुणाला तरी फोन करा, ईसीजीचा हृदयाशी थेट संबंध आहे. काही झाले तर?

त्यावर वॉर्डबॉय म्हणतो की, मी लॅब टेक्निशियन नाही आणि तो दिवाळीच्या रजेवर घरी गेला आहे. मला काही करायचे नाही. सर्व काही योग्य ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जे काही काम होईल ते मशीन करील. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य जोधा यांनी सांगितले की, हा व्हिडीओ शुक्रवारी समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

लॅब टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्ड बॉयने केली ईसीजी चाचणी

जोधा यांनी सांगितले की, चुकीचे ईसीजी पॉइंट्स लावले गेल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. पॉईंट योग्य ठिकाणी न लावल्यास अहवाल योग्य प्रकारे येत नाही. मग अशा परिस्थितीत योग्य उपचार करणे शक्य होत नाही.

Story img Loader