मागील अनेक दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshi Math) हे नाव अनेकांनी ऐकलं असेल, कारण तेथील लोकांवर एक भयानक संकट ओढावलं आहे. ते म्हणजे या शहरातील अनेक घरांना भूस्खलनामुळे मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही अवस्था होण्यामागे तिथे नव्याने सुरु करण्यात आलेली विकासकामे असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शिवाय भूस्खलनग्रस्त जोशीमठमधील संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारी याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे जोशीमठ चांगलेच चर्चेत होते.

आता पुन्हा एकदा जोशीमठ चर्चेत आलं आहे, मात्र, यावेळी ते नैसर्गिक आपत्ती किंवा सरकार आणि स्थानिकांच्या वादासाठी नव्हे तर आकर्षक आणि विहंगम निर्सगाच्या दृश्यासाठी आलं आहे. कारण सध्या जोशीमठ येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असून त्या ठीकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बर्फवृष्टीची दृश्य पाहण्यासारखी आहेत. ही दृश्य तुम्हालाही आवडतील यात शंका नाही.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

हेही पाहा- ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ गाण्यावर वयस्कर मित्रांनी केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना पडली भुरळ; म्हणाले “सिद्ध झालं वय केवळ…”

या बर्फवृष्टीचा व्हिडीओ @ANI या वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर कला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी तो लाईकही केला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ही बर्फवृष्टी नेहमीपेक्षा अधिक धोकादायक आहे, तो परिसर लँडस्केपमुळे आधीच डळमळीत झालेला आहे.

हेही पाहा- वॉश बेसिनमध्ये बसून भांडी धुणाऱ्या वानराचा Video व्हायरल; पुरुषांना होतेय लॉकडाऊनची आठवण

तर आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की, ‘देव जोशीमठच्या रहिवाशांना धीर देवो, कारण आधीच येथील लोकांच्या घरांना तडे गेले आहेत आणि आता ही बर्फवृष्टीने त्यांचे नुकसान होत आहे.’ त्यामुळे हा नजारा पाहायला सुंदर असला तरी तेथील लोकांना त्रास होत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. शिवाय ते जोशीमठ येथील लोकांसाठी सदिच्छा देखील व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे.