भारतातील प्रसिद्ध पत्रकार सुधीर चौधरी यांनी झी न्यूजमधून आपल्या पदाचा राजनीमा दिला आहे. मात्र त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. सुधीर चौधरी हे देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पत्रकारांपैकी एक आहेत. मात्र आता त्यांनी राजीनामा दिल्याने अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत. यामध्ये त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर पहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर चौधरी हे झी न्यूजचे मुख्य संपादक आणि सीईओ होते. त्यांनी या पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी संस्थेकडे राजीनामा पत्र सादर केले आहे. झी न्यूजचे मालक सुभाष चंद्रा यांनींही या प्रकरणासंदर्भात मध्यस्थी करत सुधीर यांना नोकरी न सोडण्यासंदर्भातील चर्चा केल्याचंही वृत्त आहे. मात्र सुधीर हे नोकरी सोडण्यावर ठाम आहेत. चंद्रा यांच्या मध्यस्थीच्या बातम्यांना आणि सुधीर यांनी नोकरी सोडल्याच्या वृत्ताला संस्थेच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (एचआर) रुचिरा श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला आहे.

‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना…’ २०१९ सालचा देवेंद्र फडणवीस यांचा ‘तो’ डायलॉग चर्चेत

गेल्या अनेक दिवसांपासून सुधीर यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असल्या तरी सुधीर हे सुत्रसंचालन करत असणाऱ्या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन दुसऱ्या अँकरकडे सोपवण्यात आल्यापासूनच सुधीर यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनं अधिक जोर पकडला. रोहित रंजन गेल्या तीन दिवसांपासून डीएनए होस्ट करत आहे.

तीन दशकांपासून पत्रकारितेमध्ये असणाऱ्या सुधीर चौधरी हे प्रसारमाध्यम क्षेत्रामध्ये स्वत:ची कंपनी स्थापन करण्याच्या विचारात आहेत. दुसरीकडे सुधीर यांच्या राजीनाम्यानंतर अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist sudhir chaudhary leaves zee news discussion on social media due to resignation pvp
First published on: 02-07-2022 at 11:17 IST