Jugaad Viral Video: जिथे हुशारी असते तिथे कशाचीच कमी नसते असं म्हणतात. म्हणजे अगदी मोजक्या साधनांमध्ये कमाल करून दाखवण्यासाठी तर भारताची विशेष ओळख आहे. अगदी आपल्याच भाषेत सांगायचं तर जुगाडूपणा भारतीयांना उत्तम जमतो. काही वेळा याच जुगाडांमधून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या होतात तर काही वेळा प्रयोग फसतात. आता सध्या व्हायरल होणारा जुगाड नेमका कोणत्या गटात मोडतो हे आपण व्हिडीओ पाहूनच ठरवूया. तर इंस्टाग्रामवर @viralwarganet या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता ज्यावर आतापर्यंत ४१ दशलक्ष म्हणजे तब्बल ४ कोटींहून अधिक व्ह्यूज आले आहेत. व्हिडिओचा विषय काय तर घराची सुरक्षा. आपल्या घराच्या सुरक्षेसाठी कित्येकजण लाखो रुपये खर्च करतात. आजपर्यंत आपणही सिनेमांमध्ये किंवा काही ठिकाणी प्रत्यक्ष सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या लॉक सिस्टीम पाहिल्या असतील. कोड वापरून दरवाजा उघडणार, आत यायचं असेल तर आधी तुमचे डोळे स्कॅन केले जाणार हे एवढं तंत्रज्ञान असताना एका पठ्ठ्याने चक्क एका बॉटलचं झाकण वापरून त्यापासून दरवाजाला कडी घातली आहे. विश्वास बसत नाही ना? तुम्ही बघू शकता यामध्ये त्याने बॉटलच्या तोंडाकडचे थोडे प्लॅस्टिक दरवाजा जिथे बंद होतो त्या दोन्ही बाजूंना थोडेथोडे लावले आहे जेव्हा दरवाजा बंद करायचा असतो तेव्हा त्यावर बॉटलचं झाकण लावतो आणि हवेच्या दबावामुळे दार लॉक होतं आणि जेव्हा दार उघडायचं असतं तेव्हा सोप्या पद्धतीने तो झाकण उघडतो. Video: दारावर कडी नाही नुसतं बाटलीचं झाकणच करेल काम हे ही वाचा<< भारतीय रेल्वेमध्ये ‘पूर्वजांची’ भरती! तिकीट काढायच्या संगणकावर काम केलं सुरु; वेग पाहून तर डोकंच धराल दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यावर मजेशीर भाषेत टीका केली आहे. "वाह्ह एका झटक्यात तुटून पडेल अशी Z+सिक्युरिटी", "तुम्हाला जेव्हा घरात चोरी व्हावी असं वाटत असेल तेव्हा असं करा", "जेव्हा तुमच्या घरात चोरून न्यायला काहीच नसतं" अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर दिसत आहेत. आता मुळात या कमेंट्स खऱ्या आहेत की हा जुगाड भन्नाट आहे हे जर कोणी ट्राय करून पाहिलं तरच लक्षात येईल. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवा.