Unique Bus Jugaad Viral Video : एखादी गोष्ट करायला फक्त पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर डोकं लावण्याचं कसब अंगी असावं लागतं, असं म्हणतात. त्यामुळे भारतात अशी जुगाडू डोकी असलेली मंडळी सगळीकडे भरभरून आहेत. आजवर समोर आलेल्या कित्येक व्हिडीओमधून आपल्याला त्याचे प्रात्यक्षिकसुद्धा बघायला मिळाले आहे. तर आज व्हायरल होणारा व्हिडीओ बस प्रवासादरम्यानचा आहे, ज्यामध्ये सीटवर बसताना बॅग मांडीवर घेऊन बसावी लागणार नाही यासाठी जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे…
बस प्रवासादरम्यान एक प्रवासी खिडकीपाशी बसलेला दिसतो आहे. बॅग घेऊन प्रवासात बसण्यात त्याला अडचण येत असल्यामुळे प्रवाशाने त्याच्या बॅगेतील पेन्सिलचा जबरदस्त उपयोग केलेला दिसतो आहे. त्यांनी पेन्सिल खिडकीच्या बाजूला असणाऱ्या फटीत उभी ठेवली आणि त्या पेन्सिलला स्वतःची बॅग लटकवली आहे, जेणेकरून प्रवास करताना त्यांना अडचण वाटणार नाही आणि ते सीटवर अगदी आरामात बसू शकतील. हे दृश्य बसमध्ये उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पाहिले आणि ते रेकॉर्ड करून घेतले आहे.
“काय डोकं लावलं आहे” (Viral Video)
अनेकदा प्रवासात स्वतःपेक्षाही जास्त सामानाची काळजी घ्यावी लागते. त्यातच बॅगला संपूर्ण प्रवासात घेऊन बसणेही शक्य नसते. बॅग ठेवण्यासाठी स्टँड सीटवर असतात; पण सामान चोरी किंवा बॅगची अदलाबदलस होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे बॅग नजरेसमोर राहण्यासाठी या प्रवाशाने पेन्सिलचा जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे आणि खिडकीपाशी बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. बॅग ठेवण्यासाठी प्रवाशाने केलेला जुगाड व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_j.effect या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “पेन्सिलचा असाही उपयोग होऊ शकतो, असा मी विचार नव्हता केला”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “काय डोकं लावलं आहे”, “आता मीपण पेन, पेन्सिल प्रवासात घेऊन जाणार”, “पेन्सिलचा असाही वापर होऊ शकतो कधी विचार केला नव्हता” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
