scorecardresearch

Premium

स्टारबक्सच्या कॉफीवर बसल्या जागी २१० रुपयांचं डिस्काउंट, कसं काय? ‘हा’ जुगाड पाहून म्हणाल, “काय डोकं”

Viral Tweet: काही जण “घेणार तर स्टारबक्सचीच कॉफी घेणार” या अलिखित नियमाचे गांभीर्याने पालन करतात. असाच एक कॉफी फॅन अलीकडे स्टारबक्समध्ये गेला होता, इथे त्याने…

Jugadu Man Save 210 rupees on Starbucks Coffee On The Spot These Hack Will save your Money and Will Drop Jaw
स्टारबक्सच्या कॉफीवर बसल्या जागी २१० रुपयांचं डिस्काउंट मिळवलं, कसं काय? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Man Jugad To Save Money On Starbucks Coffee: भारतामध्ये कॉफी ही साध्या नाक्यावरच्या चहाच्या टपरीवर जरी मिळत असली तरी अनेकदा श्रीमंतीची निशाणी मानली जाते, “तुम्ही काय बाबा मोठी माणसं, कॉफी घेणारी माणसं” हे असे टोमणे तुम्हीही ऐकले असतील. कॉफीची गणना अगोदरच श्रीमंतांच्या पेयांमध्ये होत असताना स्टारबक्ससारख्या मोठाल्या शोमध्ये जाणं म्हणजे आणखीनच फॅन्सी मानलं जातं. खरं सांगायचं तर हे सर्व फक्त सोशल मीडियावर दाखवायचे आणि विचारांचे खेळ असले तरी काही जण “घेणार तर स्टारबक्सचीच कॉफी घेणार” या अलिखित नियमाचे गांभीर्याने पालन करतात. असाच एक कॉफी फॅन अलीकडे स्टारबक्समध्ये गेला होता, इथे त्याने दाखवलेला जुगाड सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Sandeep Mall या ट्विटर वापरकर्त्याने स्टारबक्समध्ये कॉफी ऑर्डर करताना पैसे वाचवण्याचा आपला भन्नाट जुगाड शेअर केला आहे. तो म्हणाला की त्याने स्टारबक्समध्येच बसून झोमॅटोवर कॉफीची ऑर्डर दिली. त्यात त्याला स्टारबक्स कॉफी अवघ्या १९० रुपयांमध्ये मिळू शकत होती आणि प्रत्यक्ष स्टारबक्स मध्ये या कॉफीची किंमत ४०० रुपये होती. झोमॅटोवर मिळणाऱ्या डिस्काउंटमुळे त्याने चक्क २१० रुपये वाचवले होते. स्टारबक्सचा फील आणि बचत दोन्हीसाठी हा भन्नाट जुगाड पाहून नेटकरीही खुश झाले आहेत.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

स्टारबक्सच्या कॉफीवर २१० रुपयांचं डिस्काउंट मिळवलं, कसं?

हे ही वाचा<< कुस्तीपटू साक्षी मलिकने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केली ‘ही’ चूक; Viral ट्वीटचं सत्य वाचून व्हाल थक्क

दरम्यान, संदीप यांच्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करून भन्नाट हुशारीचे कौतुक केले आहे. दुसरीकडे काहीजण या ट्वीटवर जोरजोरात बोलून सगळ्यांना स्कीम सांगितली आता स्टारबक्स यावर ऍक्शन घेईल अशाही कमेंट करत आहेत. तुम्हाला हा हुशारीचा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jugadu man save 210 rupees on starbucks coffee on the spot these hack will save your money and will drop jaw svs

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×