सध्या सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी जंगलात शिकार करतानाचे, कधी प्राण्यांच्या झुंजीचे, तर कधी जंगली प्राण्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असे व्हिडीओ प्रचंड चर्चेतही येतात. कोणता प्राणी कधी येऊन कोणावर हल्ला करेल काही सांगू शकत नाही, त्यामुळे प्राण्यांविषयी जेवढा लोकांना जिव्हाळा आहे तेवढीच भीतीदेखील आहे. त्यामुळे लोक बऱ्याचदा प्राण्यांपासून दूर पळताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, एवढं नक्की.

गुजरातमधील जुनागडमध्ये सिंह मुक्तपणे फिरताना दिसले तर त्यात नवीन काही नाही. जुनागडसह आजूबाजूच्या अनेक भागांत सिंह निवासी भागात फिरत असून, याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन सिंह एका गायीची शिकार करताना दिसत आहेत. तेवढ्यातच एक बैल तिथे पोहोचतो. आणि गायीला वाचविण्यासाठी त्या दोन सिंहाना जोरदार टक्कर देतो.

सिंहांनी गायीवर केला हल्ला

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन सिंह एकत्र गायीची शिकार करताना दिसत आहेत. गायीने जवळजवळ हार मानली होती आणि सिंहांनी तिचा ताबा घेतला होता. दूरवर उभे असलेले दुचाकीस्वार त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. तेवढ्यात एक बैल तिथे पोहोचला. बैलाने गाय सिंहांच्या तावडीत अडकलेली पाहिली आणि नंतर गायीला वाचवण्यासाठी धावत गेला.

(हे ही वाचा: ‘ती’ भेट ठरली शेवटची! समुद्रकिनाऱ्यावर आली एक लाट अन् तरुणी क्षणात..; प्रियकर ओरडतच राहिला, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO)

दोन्ही सिंह रस्त्याच्या कडेला गाईला धरून बसले होते, दरम्यान, एक काळा रंगाचा बैल सिंहांच्या जवळ आला आणि सिंहांच्या तावडीतून गायीला सोडवण्याचा प्रयत्न करु लागला. ही लढाई इतकी गंभीर झाली की जणू एकमेकांचा जीव घेऊनच ती संपेल असं वाटत होतं. दोन्हीं सिंह गायीला पकडून पुन्हा पुन्हा इकडे तिकडे हलवू लागतात. परंतु या गायीचा बचाव करण्यासाठी बैलाची झुंज इतकी गंभीर होती की यामध्ये कुणा एकाचा मृत्यू होईल असे वाटतं होते.  मात्र, शेवटी जे झाले ते पाहून प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे. हा अनोखा व्हिडीओ तुम्हीही पाहा.

येथे पाहा व्हिडिओ

मात्र बैल दोन्हीं सिंहाना खडतर झुंज देत पळून जाण्यास भाग पाडतो. यानंतर गाय आणि बैल दोघेही तेथून पळून गेले आणि सिंह रिकाम्या हाताने गेले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जुनागड-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळील मंगरूळ तालुक्यातील असून, ते गिरनार जंगलातील गावात दिसले. व्हिडिओनुसार, मंगरोळच्या शेरियाज गावात दोन सिंह दिसले होते, त्यांनी एक गाय पकडली होती. बैल तिथे पोहोचला नसता तर गाय नक्कीच सिंहाची शिकार झाली असती.