Viral Video: जंगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर जंगलातील दृश्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपल्यासाठी केवळ एक थरारक घटना दाखविणारा क्षण असला तरीही तो शिकार करणाऱ्या आणि शिकार झालेल्या प्राण्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी घटना असते. खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.

जंगलातील प्रत्येक प्राणी हा अन्नसाखळीतील एका महत्त्वाच्या पातळीवर असतो. जंगलातील गवत, झाडांची पाने, फळे आणि बिया यावर हरीण, ससा, हत्ती, माकड यांसारखे शाकाहारी प्राणी जगतात. या शाकाहारी प्राण्यांची शिकार वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे मांसाहारी प्राणी करतात. तर साप, गरुड यांसारखे शिकारी प्राणी लहान प्राण्यांवर अवलंबून असतात. मृत प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष सूक्ष्मजीव विघटित करून मातीमध्ये पोषकद्रव्ये परत आणतात. अशा प्रकारे जंगलातील अन्नसाखळीमुळे ऊर्जेचा प्रवाह आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.

समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक
व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एक वाघ रानगव्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

जंगलातील शिकारीचे प्रसंग नेहमीच थरारक आणि लक्षवेधी असतात. अशाच एका व्हिडीओमध्ये वाघ रानगव्याची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रानगवा हा आकाराने मोठा आणि ताकदवान वन्यप्राणी असल्याने त्याची शिकार करणे वाघासाठीही आव्हानात्मक असते. योग्य संधी साधून वाघ रानगव्यावर झडप घालताना दिसतो. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रानगवा स्वतःचा बचाव करण्यासाठी जोरदार प्रतिकार करताना दिसतो. शिकारीदरम्यान दोन्ही प्राण्यांची ताकद, वेग आणि बचाव करण्याची धडपड या दृश्यातून स्पष्टपणे पाहायला मिळते. जंगलातील अन्नसाखळीमध्ये वाघासारखे मांसाहारी प्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात, तर रानगवा हा जंगलातील प्रमुख शाकाहारी प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे अशा प्रसंगातून जंगलातील नैसर्गिक अन्नसाखळी आणि वन्यजीवांमधील संघर्षाची झलक पाहायला मिळते. हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @
NaturesKings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास दोन मिलियन व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बापरे! वाघाची शिकार करण्याची पद्धत खतरनाक आहे” दुसऱ्याने लिहिलेय, “खूपच भयानक” तिसऱ्याने लिहिलेय, “आज वाघाचा दिवस होता”