Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर जंगलातील दृश्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपल्यासाठी केवळ एक थरारक घटना दाखविणारा क्षण असला तरीही तो शिकार करणाऱ्या आणि शिकार झालेल्या प्राण्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी घटना असते. खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.
समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एका वाघाने हरणावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या वाघाला हरणांचा एक कळप दिसतो. यावेळी वाघ सावध होईन योग्य वेळ साधून हरणावर हल्ला करण्यासाठी तयार होतो, दुसरीकडे हरणाच्या कळपालाही आसपास वाघ असल्याची चाहूल लागते. त्यामुळे ते सावध होतात, बराच वेळ कळप एका जागी शांत उभा राहतो. इतक्यात त्यातील एक हरण वाघाला पाहून वेगाने पळण्याचा प्रयत्न करतो आणि वाघाच्या तावडीत सापडतो. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @Arjun UKया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास एक मिलियन व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बापरे! वाघाची शिकार करण्याची पद्धत खतरनाक आहे” दुसऱ्याने लिहिलेय, “खूपच भयानक” तिसऱ्याने लिहिलेय, “आज वाघाचा दिवस होता”
