scorecardresearch

‘कच्चा बदाम’ ते ‘मेरा दिल ये पुकारे..’ २०२२ मध्ये ‘हे’ व्हिडीओ झाले सर्वाधिक Viral; यातील तुमचा आवडता व्हिडीओ कोणता?

२०२२ मध्ये कोणत्या व्हायरल व्हिडीओंनी नेटकऱ्यांची मनं जिंकली पाहा

‘कच्चा बदाम’ ते ‘मेरा दिल ये पुकारे..’ २०२२ मध्ये ‘हे’ व्हिडीओ झाले सर्वाधिक Viral; यातील तुमचा आवडता व्हिडीओ कोणता?
२०२२ मधील व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंची रेलचेल रोजच पाहायला मिळते. त्यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांना इतके आवडतात की ते अधिकाधिक शेअर केले जातात. असे व्हिडीओ इंटरनेटवर अधिराज्य गाजवतात. यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अशा अनेक व्हिडीओंनी नेटकऱ्यांची मन जिंकली. वर्षाच्या सुरूवातीला व्हायरल झालेल्या ‘कच्चा बदाम’पासून ते नुकत्याच व्हायरल झालेल्या ‘मेरा दिल ये पुकारे..’ वरील व्हायरल डान्सपर्यंत काही व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाले. कोणते आहेत ते व्हिडीओ पाहा.

२०२२ मध्ये सर्वाधिक व्हायरल झालेले व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

कच्चा बदाम
वर्षाच्या सुरूवातीलाच एका बदाम विक्रेतेच्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. बदाम विकण्यासाठी या विक्रत्याने तयार केलेल्या गाण्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली. या गाण्यातील शब्द वापरून त्याला संगीतबद्धही करण्यात आले होते. क्वचित असे काही लोक असतील ज्यांना हे गाणे माहित नसेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर हे गाणे व्हायरल झाले. सेलिब्रेटिंपासून सामान्यांपर्यंत हा गाण्यावरील रील्स शेअर केले होते. पाहा व्हायरल झालेला हा व्हिडीओ

वधुच्या वडिलांचा ‘पुष्पा’मधील गाण्यावर केलेला डान्स
लग्नातील अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होतात. पण यावर्षी एका डान्स व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले. वधुच्या वडीलांनी ‘पुष्पा’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘ओ अंतवा’ गाण्यावर केलेल्या डान्सने नेटकऱ्यांची पसंती मिळवली. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पाहा सर्वाधिक व्हायरल झालेला हा व्हिडीओ.

आणखी वाचा: मॅच आणि बायकोचा मेकअप.. दोघांची अशी घातली सांगड; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ‘याला तर…’

किली पॉलचा ‘आज तक’ ट्युनवरील डान्स
टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल अनेक बॉलीवूड गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये किली पॉलच्या ‘आज तक’ ट्युनवरील डान्स व्हिडीओचाही समावेश आहे. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या ट्युनवर त्याने केलेला डान्स नेटकऱ्यांना आवडला, पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ.

ब्राझीलमधील वडील आणि मुलीचा ‘पुष्पा’वरील व्हायरल डान्स

‘पुष्पा’ चित्रपटासह, गाण्यांचीही क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली. सेलिब्रेटिंपासून सामान्यांपर्यंत या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याची आणि त्यातील स्टेपची सर्वांना भुरळ पडली. ब्राझीलमधील वडील आणि मुलीचा या गाण्यावरील डान्स प्रचंड व्हायरल झाला होता. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

‘पाकिस्तानी गर्ल’ आयेशाचा ‘मेरा दिल ये पुकारे..’ गाण्यावरील डान्स

काही दिवसांपुर्वीच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या १८ वर्षांच्या आयेशाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे आयेशा सोशल मिडीया स्टार झाली असून तिला या एका व्हिडीओने प्रसिद्धी मिळवून दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या गाण्यावर त्यांचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

२०२२ मध्ये हे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाले, यातील स्टेप्स, गाणी यांवर अनेकांनी त्यांचे व्हिडीओही शेअर केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 11:36 IST

संबंधित बातम्या