scorecardresearch

Premium

दोन्ही बाजूंनी घर आणि इवल्याशा चाळीतून कसा काढला बाहेर काळाचौकीचा महागणपती? थरारक VIDEO पाहून व्हाल अवाक्

Kalachowki Cha Mahaganpati दोन्ही बाजूंनी घर आणि मधल्या चिमुकल्या गल्लीतून एक भलीमोठी मुर्ती, थरारक व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

alachowki Cha Mahaganpati How To Bring Out Ganpati Visarjan 2023
इवल्याशा चाळींतून कसा काढला बाहेर काळाचौकीचा महागणपती?

राज्यभरात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून, मनामनात आणि चराचरात गणपती बाप्पाचाच नामघोष सुरू आहे. घरोघरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं जात होतं. तर सार्वजनिक गणपतींचं दर्शन पाहण्यासाठीही भाविकांचे जत्थेच्या जत्थे उत्साहाने जमा होत होते. याच लाडक्या बाप्पाला आज भक्तांनी निरोप दिला. या निरोपाचा सोहळा पाहण्यासाठीही रस्तोरस्ती भरगच्च गर्दी जमलीय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन्ही बाजूंनी घर आणि मधल्या चिमुकल्या गल्लीतून एक भलीमोठी मुर्ती वाजत गाजत नेली जात आहे. गणपती बाप्पाचा हा थरारक व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मुर्ती आणली जातेय तो मार्ग अत्यंत निमुळता आहे. दोन्ही बाजूंना घरं आहेत. पण लक्षवेधी बाब म्हणजे मुर्तीकारानं या रस्त्याचा विचार करूनच अगदी योग्य मोजमापाची मुर्ती तयार केलीये. त्यामुळे हे गणपती बाप्पा अगदी सहजरित्या या चिमुकल्या गल्लीतूनही मंडपात जात आहेत. शिवाय भोवताली भक्तगण अगदी नाचत, जल्लोष करत बाप्पाचं स्वागत करतायेत.

pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
Angry husband danced in such a way that his wife would never forget for rest of her life
VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?
Bride groom mandap video trending on social media
VIDEO: नवरदेवानं नाकारलं भटजींनी घ्यायला लावलेलं वचन! नवरी चिडली अन् पुढे झालं असं की…
dog balancing glass on his head viral video
Video : तोंडात लाकडी फळी त्यावर दोन ग्लास अन् एक डोक्यावर; श्वानाचे हे अफलातून कौशल्य पाहा

या चिमुकल्या गल्लीतून निघते गणपत्ती बाप्पाची भव्य मिरवणूक पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणूनच जग यांना शिव्या घालतं”; पाकिस्तानात दोन नेते LIVE शोमध्ये भिडले; अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तुडवलं

दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा लाडका गणराया आज निरोप घेत आहे. देशभरात गणपती विसर्जन मिरवणुकांची जंगी तयारी आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. त्याआधी देशातील विविध भागात दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे वाजतगाजत विसर्जन केले. अलोट गर्दी आणि तरुणांच्या उत्साही वातावरणात या मिरवणुका पार पडल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kalachowki cha mahaganpati how to bring out ganpati visarjan 2023 video viral news in marathi srk

First published on: 29-09-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×