scorecardresearch

कमला हॅरिस यांच्या नवऱ्याला Mrs.बायडन यांनी चारचौघात केलं किस; ‘तो’ फोटो व्हायरल होताच..

हा फोटो जो बायडन यांच्या भाषणाआधी काढण्यात आला होता.

joe biden and kamala harris
जो बायडन – कमला हॅरिस (संग्रहित)

Smooch Of Union : रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेमधील प्रतिनिधीगृहावर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विभाजित काँग्रेसवर त्यांचे भाषण दिले. या भाषणामध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मित्र संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन दिले. त्यावेळी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, त्यांचे पती आणि रिपब्लिकन पक्षातील अनेक प्रमुख सदस्य उपस्थित होते. मंगळवारी रात्री बायडन यांनी नॅशनल हिलवरील स्टेट ऑफ द युनियनमध्ये पुन्हा भाषण दिले. बहुमत गमावल्यानंतरचे हे त्यांचे पहिले भाषण ठरले.

या कार्यक्रमामधील एका फोटोने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ आणि जो बायडन यांच्या पत्नी जील बायडन यांचा चुंबन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर लोकांनी कमेंट करत त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमुळे त्या दोघांवरही मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे.

मंगळवारी जो बायडन यांनी स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणामध्ये अमेरिकेच्या अर्थकारणाबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, कोविड-१९ आणि रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण या दोन्ही महत्त्वपूर्ण घटनानंतरही अमेरिकन अर्थव्यवस्था तुलनेने जगातील इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे. भाषणादरम्यान त्यांनी नवनिर्वाचित सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांना अभिवादन केले. तसेच पहिले कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक पक्षाचे नेते हकीम जेफरीज यांनाही मान्यता दिली.

२०२१ मध्ये जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. तेव्हा कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकन राजकारणामध्ये उपराष्ट्राध्यक्ष या पदापर्यंत पोहचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला बनल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 13:55 IST