Labour Day 2024 Wishes SMS Status : १ मे हा जगभरामध्ये कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. कामगार चळवळींचे स्मरण व्हावे , या उद्देशाने जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये १ मे रोजी कामगारांना सुट्टी दिली जाते. महाराष्ट्रात १ मे ला महाराष्ट्र दिनासह कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात. जाणून घ्या एकापेक्षा एक सुंदर मेसेज.

कामगार दिन २०२४ शुभेच्छा संदेश (Photo : Loksatta Graphics Team)

श्रमांच्या घामात भिजून जो प्रत्येक दिवसाचे कष्ट सार्थकी लावतो
त्या प्रत्येकाला कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा

दिवस हक्काचा
दिवस कामगारांचा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगार दिन २०२४ शुभेच्छा संदेश (Photo : Loksatta Graphics Team)

कामगाराच्या घामाला मिळो योग्य तो दाम
त्यांच्या हाताला मिळो काम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगाचा पोशिंदा, अतोनात कष्ट करतो
बाप माझा शेतकरी, कुटुंबाचे पोट भरतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : वैवाहिक आयुष्यात आनंदी कसं राहायचं? ८२ वर्षीय आजोबांनी तरुणाईला दिला एकच सल्ला, पाहा VIDEO

कामगार दिन २०२४ शुभेच्छा संदेश (Photo : Loksatta Graphics Team)

देशाच्या जडणघडणीत
मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिक बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जो जीवंत ठेवतो कामाचे आगार, उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला खूम मोठा सलाम आहे.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणतेही काम क्षुल्लक नसते. आपल्या कामाला महत्त्व द्या. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कामगार दिन २०२४ शुभेच्छा संदेश (Photo : Loksatta Graphics Team)

कामगार हा देशाचा अदृशय कणा आहे. त्यांच्यामुळेच देश मजबूत दिसून येतो. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले आवडते काम करा आणि कामाचा आनंद घ्या.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कामगारांचा सन्मान करा
त्यांच्या कामाचा आदर करा.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

कामगार दिन २०२४ शुभेच्छा संदेश (Photo : Loksatta Graphics Team)

उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे.
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

जगतो जगासाठी आयुष्यभर, मायमातीचा आधार, नाही कुणाचा लाचार, माझ्या भूमितला कामगार. कामगार दिनाच्या शुभेच्छा!