बॉलिवूड चित्रपट ‘डर’ प्रमाणे एका माथेफिरु प्रेमी स्वत:ची ओळख लपवत विवाहित महिलेचा छळ करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाय या माथेफिरुला महिलेने भेटण्यास नकार दिला म्हणून त्याने महिलेच्या घरी चक्क रुग्णवाहिका पाठवली आहे. इतकंच नव्हे तर त्याने महिला आत्महत्या करणार असल्याचं सांगत पोलिसांनाही तिच्या घरी पाठवलं. या अनोळखी प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना कानपूरच्या नौबस्ता पोलीस स्टेशन परिसरातील असून तिथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला एक माथेफिरु त्रास देत आहे. या माथेफिरुने विवाहीत महिलेला लग्न करण्याचा प्रस्ताव देखील पाठवला होता मात्र, महिलेने त्याचा धुडकावून लावल्यामुळे मागील २ महिन्यांपासून हा माथेफिरु महिलेसह तिच्या कुटुंबीयांना फोन करुन धमक्या देत आहे.

हेही वाचा- घोर कलियुग! मुलीचं लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलं अन् आई प्रियकरासोबत पळाली, जाताना मुलीचे दागिनेही घेऊन गेली

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्रास देणाऱ्या या माथेफिरु प्रियकराने त्याची ओळख उघड केलेली नाही. शिवाय २ दिवसांपूर्वी त्यांने काशीराम हॉस्पिटलमधून महिलेची प्रसूती करायची आहे, असे सांगून त्याने रुग्णवाहिका पाठवायला सांगितली. पण रुग्णवाहिका महिलेच्या घरी पोहोचली असता, असं काही नसल्याचं समोर आलं. ही घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण दुपारी चक्क पोलीस महिलेच्या घरी पोहोचले, कारण पोलिसांना महिला आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती. पण ते घटनास्थळी गेले असता आपणाला खोटा फोन आला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

हेही पाहा- कर्म तैसे फळ! रस्त्याने निघालेल्या म्हशीला लाथ घातली आणि करुन घेतली स्वत:ची फजिती

दोन महिन्यांपूर्वी आलेला फोन –

दरम्यान, माथेफिरुच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांकडे आपल्या सुनेला एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे. तसंच या विवाहितेला दोन महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्ती महिलेला “माझं तुझ्यावर प्रेम असून तुझाशी लग्न करायचं आहे” असं म्हणाला. यावेळी महिला त्याला ओरडली आणि फोन ठेवला.

मात्र, त्यानंतर या व्यक्तीचा रोज फोन येऊ लागला असल्याचंही महिलेने पोलिसांना सांगितलं. महिलेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. शिवाय महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देणाऱ्या माथेफिरुचा तपास घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur blackmailing case unknown man sends ambulance and police to married womans home jap
First published on: 06-12-2022 at 16:14 IST