Karate Dog: कुत्र्याने घातला राडा.. मांजरीला शिकवला धडा, पहा मजेशीर Viral Video

आजवरच्या कुत्रा मांजरीच्या भांडणात कुत्र्याने बाजी मारलीये असं म्हणायला हरकत नाही, निदान या Viral Video मध्ये तरी असंच दिसत आहे.

Karate Dog: कुत्र्याने घातला राडा.. मांजरीला शिकवला धडा, पहा मजेशीर Viral Video
Karate Dog (फोटो: Twitter/@MorissaSchwartz)

प्राण्यांचे एकमेकांशी पंगे घेतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर दरदिवशी व्हायरल होत असतात, त्यातही कुत्रा- मांजरीची भांडणे म्हणजेच पूर्वापार चालत आलेली दुश्मनी म्हणता येईल. कधी कुरघोडी करत तर कधी रागाने गुरगुरत वर्षानुवर्षे जपलेलं हे शत्रुत्व आपणही अनेकदा प्रत्यक्ष पाहिलं असेल. केवळ कुत्रा मांजरीचं नव्हे तर त्या दोघांमध्ये बेस्ट पेट कोण आहे या मुद्द्यावर चक्क त्यांचे पालकही भांडत असतात. कुत्रा कसा प्रामाणिक व प्रेमळ आहे असे म्हणत कुत्राप्रेमी तर मांजरीचा swag किती कूल आहे म्हणत मांजरीचे मालक सोशल मीडियावर लढाईला उतरलेले तुम्ही सुद्धा पाहिले असेल. पण आता या दोन्ही प्राण्यांमध्ये कुत्र्याने बाजी मारलीये असं म्हणायला हरकत नाही, निदान या Viral Video मध्ये तरी असंच दिसत आहे.

International Cat Day 2022: सोमवारचा थकवा विसराल, पहा या गोंडस, खेळकर मनीमाऊचे नखरे ..

Morissa Schwartz (Dr. Rissy) या ट्विटर युजरने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला ज्यात चक्क एक कुत्रा आपल्या कराटे कौशल्याने मांजरीला उडवून लावताना दिसतोय. खरंतर नेहमी सारखंच दोघांचं भांडण सुरु असतं, इतक्यात कुत्रा अचानक एक गोल राउंड मारत आपल्या मागच्या दोन पायांनी मांजरीला उडवून लावतो. तुम्ही आम्ही तर सोडा पण स्वतः या मांजरीच्या चेहऱ्यावर सुद्धा या अनपेक्षित कराटे प्रदर्शनाचं आश्चर्य दिसतंय.

पहा हा Viral Video

हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल २ लाख ८० हजार लोकांनी पहिला आहे तर १७०० हुन अधिक लोकांनी याला शेअर केले आहे. अनेकांनी यावर कमेंट करत हा तर ब्रूस लीच्या घरातील कुत्रा असावा असे म्हंटले आहे. तर याच्या समोर भलेभले ब्लॅक बेल्ट सुद्धा फिके पडतील अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karate dog shows black belt skill surprised cat viral video svs

Next Story
नाग-नागिणीची जोडी जेव्हा रोमॅंटिक होते… पाहा हा VIRAL VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी