Happy Kargil Vijay Diwas 2024 : कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. आजपासून २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकवला.यामुळे दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण ‘कारगिल युद्ध दिवस’ म्हणून साजरा करतो. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करुन देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? (Kargil Vijay Diwas History)

२६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय सुरु केले. जवळपास ६० दिवसांपेक्षा जास्त हे युद्ध सुरु होते. उंच पर्वतरांगा, कठोर हवामानाचा सामान करत २६ जुलै १९९९ ला भारताने पाकिस्तानचा पराभव करत कारगिल युद्ध जिंकले. या युद्धात भारतीय सैन्याचे ५०० हून अधिक जवान शहिद झाले होते तर जवळपास एक हजारहून अधिक जवान जखमी झाले होते. पण अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं. (Kargil Vijay Diwas 2024 Significance and Celebrations)

यानिमित्ताने दरवर्षी २६ जुलैला भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या आणि जवानांच्या बलिदानाच्या आठवणींना उजाळा देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. यानिमित्ताने तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे गौरवशाली दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता, तसेच जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण करु शकता.

More Stories On Kargil Vijay Diwas : Narendra Modi in Kargil Vijay Diwas : “पाकिस्तानने आपल्या इतिहासातून…”; कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा!

कारगिर विजय दिनाच्या शुभेच्छा ( Kargil Vijay Diwas 2024 Messages in Marathi)

कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना माझा कोटी कोटी प्रणाम!

कारगिल विजय दिवस
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
भारतीय वीर सशस्त्र दलाच्या
सर्व शूर सैनिकांना माझा सलाम
कारगिल विजय दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

शौर्य, पराक्रम आणि देशाच्या
शुर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक
कारगिल विजय दिवस
मातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या
प्राणाचे बलिदान दिलेल्या अमर
शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

कारगिल स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी
आज ठेवूनी त्यांच्या बलिदानाची जान
करुया भारत देशा असंख्य प्रणाम
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला
कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कारगिल युद्धा शहीद वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!

हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे
देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे
अशा भारताच्या वीर जवानांना
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला,
कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जिथे वाहते शांततेची गंगा
तिथे करून नका दंगा….
भगवा आणि हिरव्यात, करु नका भेदभाव
तिरंगा लहरु दे, शांतता राहू दे
सर्वांना विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

वतन पर मिटने वालों का यही निशान बाकी होता
हैसिर पर सेना की पगड़ी
और बदन पर तिरंगा का कफन होता है
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kargil vijay diwas 2024 wishes quotes in marathi whatsapp status images on kargil day salute the memory of brave indian soldiers sjr
Show comments