Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक जण प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा प्राण्यांची छेडछाड करतानाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मुले गायींची छेड काढताना दिसत आहे. पण पुढे त्यांच्याबरोबर जे काही घडते ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गायीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायीची पूजा केली जाते, यालाच आपण गोपूजा म्हणतो. या गायीची छेड काढणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले. एका गाईने या तरुणांना अशी अद्दल घडवली, की पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. गायींबरोबर पंगा घेणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कुस्तीचा असा डाव कधी बघितलाय का? एका पैलवानानं दुसऱ्याला अवघ्या ४० सेकंदात दाखवलं आस्मान, जंगी कुस्तीचा Video Viral

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका रांगेत गायी शांतपणे बसलेल्या दिसत आहे. तीन तरुण मुले तिथून जाताना दिसतात. दोन मुले समोर जात आहे तर एक तरुण त्या दोघांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. हे दोन तरुण मुले ये दोस्ती हम नही तोंडेगे हे गाणं म्हणत गायींबरोबर छेडछाड करताना दिसतात. पुढे दोघांपैकी एक तरुण एका गायीला पकडतो तेव्हा ती गाय वैतागून या तरुणाला हवेत उडवते. हे पाहून सर्वच तरुण घाबरतात आणि त्यानंतर व्हिडीओ बंद होतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी तरुणांवर संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लगेच कर्माचे फळ मिळाले” या व्हिडीओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”या तरुणांना अशीच अद्दल घडली पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “गायीने गाढवाचा उपचार केला” आणखी एका युजरने लिहिलेय, ” याला म्हणतात कर्म..”