VIRAL VIDEO : १ हजार ठिकाणी ५ लाख लोकांनी मिळून गायलं कानडी गाणं! निमित्त होतं…!

कर्नाटकमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कर्नाटक राज्यातल्या नागरिकांनी यंदाचा कन्नड राज्योत्सव २०२१ काहीसा हटके साजरा केलाय.

karnataka-rajyotsava-2021-Kannada-iconic-songs-viral-video

कर्नाटकमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कर्नाटक राज्यातल्या नागरिकांनी यंदाचा कन्नड राज्योत्सव २०२१ काहीसा हटके साजरा केलाय. कर्नाटकमध्ये एकाच वेळी १ हजार वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल पाच लाख लोकांनी एकत्र येत कन्नड राज्योत्सव २०२१ साठीचं कन्नड आयकॉनिक सॉंग गायलंय. या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलीय.

येत्या १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्यात कन्नड राज्योत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभराच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा अनोखं सेलिब्रेशन सुद्धा याचाच एक भाग आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी दक्षिण भारतातील सर्व कन्नड भाषिक एकत्र येऊन कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली. हा उत्सव साजरा करण्यासाठी फक्त देशातील नव्हे तर देशाबाहेरील तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त कन्नड भाषिक एकत्र येऊन वेगवेगळ्या १ हजार ठिकाणाहून कन्नड आयकॉनिक सॉंग गायलं आहे. कुणी रस्त्यावर उभं राहून, कुणी बस स्टॅंडवरून तर कुणी रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवरून या जगावेगळ्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेताना दिसून येत आला.

या अनोख्या सेलिब्रेशनमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, मैसूर पॅलेस, हम्पी आणि इतर सांस्कृतिक स्थळांसमोर उभं राहून अनेक लोकांनी हे गाणं एकत्र गायलं. या मेगा-इव्हेंटच्या इतर ठिकाणांमध्ये बेंगळुरू विमानतळ, उडुपी श्री कृष्ण मंदिर, सिद्धगंगा मठ आणि चित्रदुर्ग किल्ला या ठिकाणी सुद्धा हेच चित्र सुद्धा होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे मंत्र्यांनी सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. हे अनोखं सेलिब्रेशन कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे विधान आयोजित करण्यात आलंय. केवळ गायकच नाही तर सामान्य नागरिकांनी सुद्धा यात सहभाग घेतला. हा सरकारी कार्यक्रम नसून लोकांचा कार्यक्रम असल्याची भावना व्यक्त केली जातेय.

या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. यावरून प्रत्येक राज्यात आपआपल्या मातृभाषेसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवले जावेत, अशा सुचना देण्यात येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka rajyotsava 2021 around 5 lakh people sing kannada songs at 1000 locations prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या