लेस्बियन जोडप्याने साजरा केला ‘करवाचौथ’; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस, म्हणाले,…

या व्हिडिओच्या अगदी शेवटी कळतं की ह्या दोघी महिला एकमेकींसाठी करवाचौथचं व्रत करत आहेत. चंद्राला पाहून उपवास सोडण्याची प्रथा या दोघीही पार पाडताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

करवाचौथ हा सण महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करुन साजरा करतात. एका लेस्बियन जोडप्याने हा सण साजरा केला अशी जाहिरात नुकतीच समोर आली आहे. या जाहिरातीवरुन नेटकऱ्यांनी मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सगळ्याच प्रतिक्रिया या जाहिरातीच्या विरोधातल्या नसून काही या जाहिरातीचं समर्थनही करत आहेत.

२२ ऑक्टोबरपासून ही जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे. या जाहिरातीत दोन महिला एकमेकींना करवाचौथसाठी तयार करत आहेत. एकमेकांच्या चेहऱ्यावर ब्लीच लावत आहेत. हे करत असतानाच त्या दोघी करवाचौथचं महत्त्व आणि उपवास का करायचा अशा चर्चा करत आहेत. या व्हिडिओच्या अगदी शेवटी कळतं की ह्या दोघी महिला एकमेकींसाठी करवाचौथचं व्रत करत आहेत. चंद्राला पाहून उपवास सोडण्याची प्रथा या दोघीही पार पाडताना दिसत आहेत.

या व्हिडिओ क्लिपमध्ये डाबर कंपनीच्या फेम या ब्लीचची जाहिरात करण्यात आली आहे. या कंपनीच्या लोगोमध्ये एलजीबीटीक्यू चळवळीचं प्रतीक असलेल्या इंद्रधनुष्यातल्या रंगांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. त्यासोबत Glow with pride असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

ही क्लिप ऑनलाइन प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकीच काही प्रतिक्रिया इथे जाणून घ्या.

लेस्बियन जोडपं अशा पुरुषप्रधान प्रथा का पाळत आहेत, असा सवालही काही जणांनी विचारला आहे. तर या प्रोडक्टने वर्णभेदाचा पुरस्कार केला आहे, त्यात केवळ एलजीबीटीक्यू बाजू मांडल्याने सत्य बदलणार नाही, असं मतही काही जणांनी व्यक्त केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karwa chauth ad featuring same sex couple triggers mixed reactions online vsk

ताज्या बातम्या