Pune Viral Video : पेठा म्हणजे पुणेकरांचा पारंपारिक वारसा आहे. प्रत्येक पेठेची एक स्वतंत्र आणि ण १७ पेठा आहेत. कसबा पेठ सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, नाना पेठ, गणेशपेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, नारायण पेठ, गंज पेठ, नवी पेठ, रास्ता पेठ.
या सर्व पेठांमध्ये पुण्यातील सर्वात जुनी पेठ म्हणून ओळखली जाणारी पेठ म्हणजे कसबा पेठ होय. कसबा पेठ ही आजही तिचं अस्तित्व टिकवून आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती याच पेठेत आहे. पुण्यातील पेठेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कसबा पेठचा सुद्धा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एका मोठ्या भिंतीवर कसबा गणपती मंदिराचे चित्र दिसेल. त्यावर ‘कसबा गणपती मंदिर’लिहिलेय. त्यानंतर पुढे फणी आळी तालीम चौक दिसेल. या चौकात जुन्या पद्धतीचे घरे आणि वाडे आहेत. काही घरांच्या दरवाज्याबाहेर सुचना सुद्धा लिहिलेल्या आहेत. एका घराच्या दरवाज्यावर दोन सुचना लिहिल्या आहेत.
१. घरासमोर वाड्यासमोर बाहेरच्या गाड्या टू व्हिलर फोर व्हिलर गाड्या लावू नयेत नाहीतर पंक्चर होतील.
२. कृपा वाड्यात जाताना/येताना दरवाजा बंद करावा.
हेही वाचा : “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
u
पुढे व्हिडीओत तुम्हाला पडीत जुनी घरे सुद्धा दिसेल. काही जुन्या पद्धतीची दुकाने सुद्धा दिसतील. ही घरे आणि दुकाने पाहून काही लोकांना बालपण आठवेल. काही अशा पद्धतीची घरे तुम्हाला फक्त पुण्यात पेठेमध्येच दिसून येते. व्हिडीओत तुम्हाला सरदार आबा साहेब मुजुमदार यांचे निवास स्थान. हनुमानाचे मंदिर, सरदार शितोळे वाडा, आणखी काही जुने वाडे दिसतील. कसबा पेठेतील हा परिसर पाहून तुम्हाला तुमच्या नव्वद च्या दशकातील काळ किंवा गाव आठवेल. हल्ली गावात सुद्धा जुनी घरे पाहायला मिळत नाही पण पुण्यात अनेक जुन्या वास्तु जपून ठेवल्या आहेत आणि हीच या शहराची खासियत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
u
हेही वाचा : आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच
laibharipune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कसबा पेठ पुणे, जुने ते सोने” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मस्त” तर एका युजरने लिहिलेय, “वास्तविक” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमचा कसब्यातला वाडा पण दिसतो का ते बघत होते”