महावितरण आणि पावसाळा यांचा ३६ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पावसाळ्यामध्ये विजपुरवठा खंडित झाला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं इतकं हे नातं घट्ट आहे. मात्र वीज जाण्यासाठी पावसाची आवश्यकता असतेच असं नाही. दिव्याखाली अंधार अशी मराठीत एक म्हण आहे, तिचाच प्रत्यय संगीतकार कौशल इनामदार यांना आला. यासंदर्भातील अनुभव त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.

झालं असं की, कौशल इनामदार सोमवारी वीज बिल भरण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले होते. मात्र विरोधाभास म्हणजे या कार्यालयामध्येच वीज नसल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. याचसंदर्भात इनामदार यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. “मी महावितरणाच्या कार्यालयामध्ये वीज बिल भरण्यासाठी आहे. येथील प्रक्रिया विलंबाने सुरु आहे कारण इथे कार्यालयामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय,” असं इनामदार यांनी ट्विट केलं.

विशेष म्हणजे इनामदार यांनी केलेलं हे ट्विट व्हायरल झालं असून २४ तासांच्या आत ३०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे तर अडीच हजार जणांनी ते लाईक केलंय. मात्र या ट्विटसोबतच अनेकांनी कौशल इनामदार यांना तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन बिल का भरलं ऑनलाइन बिल भरावं ना असा प्रश्न विचारला.

१)

२)

३)

४)

५)

तर अनेकांनी महावितरणाची खिल्ली उडवल्याचं आणि मजेदार उत्तरं दिल्याचंही पहायला मिळालं.

१) बुडाखाली अंधार…

२) हे म्हणजे असं झालं की…

३) व्यवस्था सुधारण्याची गरज

४) त्यांनीच बिल भरलं नव्हतं…

५) सगळी वीज वितरीत केली…

६) इथे घराणेशाही नाही हे बरं आहे

७) प्रामाणिकपणा…

८) किती अपमान…

९) तिकडे पाऊस पडत असणार…

१०) एमटीएनएलवाले पण फोन उचलत नाहीत

या ट्विटवर सर्वाधिक उपस्थित करण्यात आलेली शंका म्हणजे कौशल इनामदार यांनी ऑनलाइन बिल का नाही भरलं. त्याला उत्तर देताना कौशल यांनी, मला रिकनेक्शन फीसुद्धा भरायची असल्याने मी कार्यालयात जाऊन बिल भरल्याची माहिती दिली. करोना लॉकडाउनमुळे बराच काळ मी माझ्या ऑफिसमध्ये न गेल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचंही कौशल यांनी सांगितलं.

कौशल यांच्या या रिप्लायवर एमएसईबीच्या मोबाईल अॅप्लिकेशनवरुन ही फीसुद्धा भरता येत असल्याचं काहींनी त्यांना सांगितलं. एकंदरितच कौशल इनामदार यांनी छेडलेल्या नाराजीच्या सुरावर त्यांच्या फॉलोअर्सनी वरचा सा लावत एमएसईबीची चांगलीच फिरकी घेतल्याचं या ट्विटखालच्या रिप्लायमध्ये पहायला मिळालं.