Shocking video: 'जय श्री बाबा केदार' असा जयघोष करीत सध्या अनेक भाविक केदारनाथ धामच्या दिशेनं येताना दिसत आहेत. देश-विदेशांतील अनेकांनीच आतापर्यंत उत्तराखंडमधील या केदारनाथ धामला भेट दिली आहे. चारधामपैकी एक असणाऱ्या केदारनाथ येथे येताना प्रतिकूल हवामान सहन करीत आणि अनेक अडचणींना तोंड देत ही भाविक मंडळी येथवर पोहोचत आहेत. पण, इथेही त्यांची परीक्षा संपलेली नाही. कारण- इथेही पुन्हा निसर्ग त्यांची परीक्षा पाहतोय. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन क्षणात पाऊस, क्षणात निरभ्र आकाश आणि हवामान बदलून लगेचच होणारी बर्फवृष्टी हे सर्व काही कमी वेळात होत असून, नागरिक या परिस्थितीशीही दोन हात करीत आहेत. पण, मागे हटेल तो निसर्ग कसला? निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे ही मंडळीही हतबल होताना दिसत आहेत. उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी पहाटे हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ खाली कोसळला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. सर्वांचाच थरकाप उडाला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या टेकड्यांवरून बर्फ वेगाने खाली येत असल्याचे दिसत आहे. केदारनाथच्या गांधी सरोवरावर हे हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केदारनाथ खोऱ्यातील हवामान काही दिवसांपासून खूपच खराब आहे आणि तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या उंच भागातील हिमनद्या वितळल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ दरवर्षी पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करते. मात्र, यावेळी निसर्गाने पुन्हा एकदा आपली अवकृपा दाखवून दिली आहे. गांधी सरोवरावर पहाटे हिमस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात बर्फाचे वादळ निर्माण झाले होते. त्यावेळचे हे दृश्य थरकाप उडविणारे आहे. पाहा व्हिडिओ हेही वाचा >> Photo: याला म्हणतात वडिलांचा धाक! तरुणानं गाडीच्या मागे लिहलं असं काही की पोट धरुन हसाल मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक हिमस्खलन झाले. पहाटे ५ वाजता गांधी सरोवराच्या वरच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. सुदैवाने हा बर्फ मंदिरापर्यंत पोहोचला नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, या टेकड्यांवर अनेकदा हिमस्खलन होत असते. पण, रविवारी झालेले हिमस्खलन फार मोठे नव्हते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.