Kedarnath Viral Video: केदारनाथ या पवित्र यात्रेशी संबंधित एका वेदनादायी व्हिडिओने लोकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. केदारनाथ यात्रा आरामदायी करण्यासाठी काही भाविक घोड्यावरुन प्रवास करतात, त्यांचे अवजड सामान मंदिरापर्यंत नेण्यासाठी घोड्याचा किंवा खेचराचा वापर करतात हे सर्वांनाच माहित आहे. पण अवजड वजन उचलण्यासाठी मुक्या प्राण्यांवर किती अत्याचार केले जातात उत्तराखंडमधील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या केदारनाथ यात्रा मार्गावर पशु क्रूरतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये सुमारे १४० किलो वजन असलेला एक व्यक्ती एका लहानशा खच्चरवर बसून होऊन डोंगराची चढाई करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे केदारनाथमधील प्राण्यांच्या हक्कांवरून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

भाविकांना गौरीकुंडपासून तब्बल १६ ते १८ किमी चढाई करून मंदिरापर्यंत जावं लागतं. अर्थात, इतकं जास्त ट्रेकिंग करणं अनेकांना झेपत नाही. देवाचे आशीर्वाद मिळवण्याची इच्छा असते, पण शरीर साथ देत नाही. परिणामी, अशा भाविकांसाठी घोडा, खेचर किंवा पालखीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापैकी कुठलाही पर्याय स्वीकारून तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता.

पण काही वेळेस लोकांचं वजन इतकं जास्त असतं की, त्यांना मंदिरात घेऊन जाणाऱ्या प्राण्यांची अवस्था अत्यंत खराब होते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एका व्यक्तीचं वजन जवळपास १४० ते १५० किलो असल्याचं सांगितलं जात आहे. तो ज्या खेचरावर बसलाय, त्याचे पाय अक्षरशः थरथरत आहेत.उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाने जनावरांच्या सुरक्षेसाठी सामानासह प्रत्येक घोडा किंवा खच्चरावर जास्तीत जास्त ८० किलोग्रॅम वजनाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओमुळे या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. विविध अहवालानुसार, केदारनाथ मार्गावर दरवर्षी क्षमतेपेक्षा जास्त वजन आणि खराब हवामानामुळे १०० हून अधिक घोड्यांचा नाहक बळी जातो.

पाहा व्हिडीओ

केदारनाथ पादचारी मार्गावर घोडे-खेचर चालकांकडून घोडे आणि खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. घोड्यांनी आणि खेचरांनी अधिक काळ काम करावे आणि जास्त वजनाचे सामान उचलावे, यासाठी त्यांना गांजा पाजला जातो. या गांजाच्या नशेमध्ये घोडे चालत राहतात आणि जेव्हा नशा उतरते तेव्हा हे घोडे जमिनीवर कोसळतात, अशा वेळी त्यांच्यावर प्रवास करणारे प्रवासी आणि सामान हे देखील खाली पडते. अशा परिस्थितीत, घोडे चालक या घोड्यांना काठीने बेदम चोप देतात आणि पुन्हा उभे राहून चालण्यास भाग पाडतात.