वन्यजीवांसाठी ‘तो’ ठरला देवदूत

त्यांना पाणी मिळावे म्हणून करतोय धडपड

प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पेट्रीक धडपडत आहे

या जगात माणुसकी राहिली नाही असे जाणत्या माणासांकडून आपण अनेकदा एकतो, ते खरंही आहे म्हणा. जगात अशा काही अप्रिय घटना घडत आहेत की यावर आपलाही विश्वासही बसला आहे. पण मुठभर लोक असेही आहेत की जे आजही ही माणसूकी जपतात. जग इतक बदलंय. माणसं माणसाला विचारत नाही तिथे मुक्या प्राण्यांना कोण विचारणार? कोणी सेल्फीसाठी यांचा बळी घेतोय तर कोणी राग म्हणून यांचा जीव घेतोय तर कोणाच्या स्वार्थाचे हे प्राणी बळी ठरत आहेत. पण एक व्यक्ती असा आहे की जो प्राण्यांसाठी धडपडत आहे.

केनियामधले पेट्रीक हे नाव फेसबुकवरून आपल्याही माहित झाले असेल. येथे दुष्काळ पडला आहे, जिथे माणसांना पाणी मिळत नाही तिथे जनावरांना कुठे मिळणार? दुष्काळामुळे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पाण्याविना येथले अनेक जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. जिथे माणसाच्या जगण्याची शाश्वती नाही तिथून हे प्राणी कुठे जगणार? पण तरीही इथल्या जनवरांसाठी पेट्रीक धडपड करतोय. तेसावो राष्ट्रीय उद्यानात झेब्रा, हत्ती रानगवे यांसारखे हजारो प्राणी आहेत. पण पाण्याविना त्यांना वणवण करावी लागत आहे, गेल्या वर्षभरात येथे शेकडो प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत.

या सगळ्या प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पेट्रीक धडपडत आहे, आपल्या ट्रकमधून हजारो लीटर पाणी गोळा करून तो घेऊन येतो आणि या उद्यानात असलेल्या एका तलावात हे पाणी सोडतो. या पाण्यामुळे इथल्या प्राण्यांची तहान भागते. जंगलातले प्राणी या तलावापाशी येतात आणि आपली पाण्याची तहान भागवतात. जे प्राणी माणसांना घाबरतात ते आता बिंधास्त पेट्रीकची वाट बघतात. त्यांचा जीव वाचवणारा दूतच पेट्रीक ठरला आहे. त्यामुळे पेट्रीकचा ट्रक येताना दिसला की प्राण्यांचा कळप तिथे धावून जातो. आपण एक दिवसही या प्राण्यांना पाणी दिले नाही तर त्यांना जीवाला मुकावे लागेल असेही पेट्रीकने सांगितले.
सुरुवातीला पेट्रीकने एकट्याने यासाठी पुढाकार घेतला, पण त्याच्या कामाबद्दल फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकजणांनी या कामासाठी त्याला पैशाची मदत देऊ केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kenya man drives hours everyday to bring water to wild animals

ताज्या बातम्या