केरळच्या आमदार आणि IAS अधिकाऱ्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

लवकरच अडकणार विवाहबंधनात

सबरीनाथ लवकर उप-जिल्हाअधिकारी दिव्या अय्यर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर केरळमधल्या आमदाराच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा आहे. आमदार आणि आयएएस अधिकारी विवाहबंधनात अडकलेले यापूर्वी कोणी कधीही पाहिले नसेल, त्यामुळे अनेकांना त्यांची ही ‘लव्हस्टोरी जाणून घेण्याची उत्सुकता होती. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा ऐकिवात तर होत्या पण आता आमदारांनी आपण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहोत, असे सांगत आपल्या प्रेमाची कबुलीच दिली आणि साऱ्या चर्चांना पूर्णविराम लावला.

केरळमधल्या अरूविक्कारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सबरीनाथ यांनी आपल्या लग्नाची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली. सबरीनाथ लवकर उप-जिल्हाअधिकारी दिव्या अय्यर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. एका कामानिमित्त पहिल्यांदा त्यांची आणि दिव्याची भेट झाली होती आणि भेटीगाठीतूनच ओळखी वाढत गेल्या. तीन वर्षांपूर्वी हे दोघेंही एकमेकांना भेटले होते. ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. काही कामानिमित्त दिव्या आणि माझी तिरूअनंतपूरम येथे भेट झाली होती. त्यानंतर आमच्यातील भेटीगाठी, जवळीक वाढत गेली आणि आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही विवाहबंधनात अडकणार आहोत तेव्हा तुमच्याही आशीर्वादाची आम्ही अपेक्षा करतो’. असे लिहित सबरीनाथ यांनी आपल्या भावी पत्नी सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

नक्की वाचा मार्क झकरबर्ग आणि प्रिसिलाची ‘टॉयलेट एक प्रेमकथा’

३३ वर्षीय सबरीनाथन यांनी इंजिनिअरिंग केलं आहे तर दिव्याने वैद्यकीयचे शिक्षण पूर्ण केले आहे. एखाद्या आमदाराने जिल्हा अधिकाऱ्याशी विवाह केल्याचे माझ्या ऐकिवात नाही त्यामुळे या लग्नाबद्दल मी खूप उत्सुक असल्याचे दिव्या अय्यर म्हणाल्या. सबरीनाथन हे केरळमधील दिवंगत आमदार कार्तिकेयन यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याही लव्ह स्टोरीची त्याकाळी खूपच चर्चा होती. कार्तिकेयन यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता, तर त्यांची पत्नी कॉलेजमध्ये शिकत होती. या दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. कार्तिकेयनचे राजकारणाले भविष्य कुठेतरी धोक्यात येईल असे वाटत असल्याने दोन्ही कुटुंबियांनी त्याकाळी लग्नाला तीव्र विरोध केला होता, पण हा विरोध झिडकारून सबरीनाथन यांच्या वडिलांनी लग्न केलं होतं. आपल्या मुलाला अशा प्रकारचा कोणत्याही विरोधाचा समाना करावा लागू नये म्हणून दोन्ही कुटुंबियांनी आनंदात या लग्नाला मान्यता दिली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kerala ias officer to marry mla ks sabarinathan