Kerala Trans Gender Couple: केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याच्या प्रेग्नंसीच्या चर्चा आपण ऐकल्या होत्या. त्यांच्या बेबी शॉवरचे फोटोसही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याच तृतीयपंथीय कपलच्या घरी पाळणा हलला आहे. इतकच नाहीतर दिमाखदार समारंभात ट्रान्सजेंडर जोडप्यानं आंतरराष्ट्रीय महिला दिनी नवजात बाळाचं नामकरणही केले. पहिल्यांदाच एका पुरुषाने बाळाला जन्म दिलाय. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव जबिया जहाद ठेवलं असून बाळाच्या लिंगाबाबत अद्याप केणतीही माहिती दिली नाही. ८ फेब्रुवारी रोजी या ट्रान्स जोडप्याला सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलगा झाला. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच घटना मानली जाते.
ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात. तृतीयपंथीयांच्या अशी प्रेमकहाणी देशातील पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. भारतात बाळाला जन्म देणारा हा पहिला ट्रान्समॅन आहे. सर्जरी दरम्यान झाहदने स्तन काढून टाकले. मात्र त्याचे गर्भाशय आणि इतर काही शरीरातील अवयव काढले नाही. या कारणामुळे तो गरोदर राहिला असून तो आता आई झाला.
मुलाला जन्म दिल्यानंतर या जोडप्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, जरी जहादने मुलाला जन्म दिला असला तरी, ट्रान्स-मॅनला बाळाचे वडील म्हणून त्याचे नाव लावायचे आहे आणि आईच्या नावाच्या जागी त्याची ट्रान्स वुमन पार्टनर झिया पावलचे नाव लिहावे. खरंतर, जिहाद ही जन्मत: एक महिला होती आणि झिया पुरूष होती. पण दोघांनीही लिंग बदलले आहेत.
हे ही वाचा<< तीन वर्षाच्या चिमुकल्याने गुदमरणाऱ्या भावाचा जीव वाचवला; Video पाहून म्हणाल, काय डोकं लावलंय पोराने!
ट्रान्सजेंडर जोडप्यानं केली इच्छा व्यक्त
दरम्यान त्यांच्या बाळाने समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा ट्रान्सजेंडर जोडप्यानं यावेळी व्यक्त केली आहे. तसेच आमच्या बाळाचा जन्म सर्वांना माहीत व्हावा अशी आमची मनापासून इच्छा होती. माझी इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पुढील सहा महिने आम्ही पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.