Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार केतू हा मायावी ग्रह मानला जातो. केतू नेहमी वक्री म्हणजेच उलट्या दिशेने भ्रमण करतो. केतूच्या चालीत होणाऱ्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. केतूची बदललेली चाल काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकते. सध्या केतू सिंह राशीत भ्रमण करत असून तो स्वतःच्या मघा नक्षत्रात विराजमान आहे.

केतूची ही वक्री चाल काही राशींचे नशीब बदलण्याची क्षमता ठेवते. केतूला मोक्ष आणि गूढ गोष्टींचा कारक मानले जाते. यंदाच्या पंचांगानुसार केतू ५ डिसेंबर २०२६ पर्यंत स्वतःच्या मघा नक्षत्रात राहणार आहे. केतूचे स्वतःच्या नक्षत्रातील हे भ्रमण काही राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया, मघा नक्षत्रातील केतूचे भ्रमण कोणत्या राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते.

पुढील ९० दिवस ६ राशींचे नशीब उजळणार, केतूच्या गोचरामुळे होणार मोठा लाभ

ज्योतिषाचार्य नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, केतू ५ डिसेंबरपर्यंत मघा नक्षत्रात भ्रमण करणार आहे. केतूच्या या नक्षत्र गोचरामुळे ६ राशींसाठी अतिशय शुभ काळ सुरू होणार आहे.

कर्क राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरणार आहे. तुमचा मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा वाढेल. अनेक कामांमध्ये यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा कायम राहील.

मेष राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. फायदेशीर संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात पदोन्नतीची संधी मिळू शकते.

धनु राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रकरणे मार्गी लागू शकतात. आनंदाची बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

सिंह राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात चांगले लक्ष लागेल. हा काळ तुमच्यासाठी शुभ मानला जात आहे. आयुष्यातील तणाव कमी होईल.

मीन राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरेल. व्यापाऱ्यांच्या कामाचे कौतुक होईल. प्रेमसंबंधही चांगले राहतील.

वृश्चिक राशीसाठी केतूचे नक्षत्र गोचर कसे असेल?

पुढील ९० दिवस केतूचे मघा नक्षत्रातील भ्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)