अमेरिकन फास्ट फूड चेन ‘केएफसी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडलीय. एवढंच नाहीतर हा वाद आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर ‘केएफसी’ला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. तसं केएफसी बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. ट्विटरवर सध्या #BoycottKFC हा हॅशटॅग ट्रेण्ड करत होता. त्यानंतर कंपनीने पुढाकर घेत आपली बाजू मांडली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…

Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year IPL What is other rule changes
एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला #BoycottKFC हॅशटॅग

केएफसीमध्ये गेल्यानंतर तिथे कन्नड गाणं लावण्यास तिथल्या कर्मचाऱ्याने नकार दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. बा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या केएफसी कंपनी विरोधात मोहीम सुरु केली आणि #BoycottKFC हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. या व्हिडीओमध्ये KFC मध्ये आलेल्या एका महिला ग्राहकाने केएफसी कर्मचाऱ्याला इंग्रजी गाण्यांऐवजी कन्नड गाणी वाजवण्याची विनंती केली आहे. यावर या कर्मचाऱ्याने कंपनीच्या नियमांचा हवाला देत कन्नड गाणं वाजवण्यास नकार दिला. ही घटना कर्नाटकमध्ये घडलीय.

नक्की काय आहे हे प्रकरण?

या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला ग्राहक KFC कर्मचाऱ्याला आउटलेटमध्ये इंग्रजी गाण्याऐवजी कन्नड वाजवण्यासाठी सांगताना दिसत आहे. यावर केएफसी कर्मचारी नकार देत म्हणाला, “कर्नाटक भारतात आहे आणि इथे राहण्यासाठी व्हिसाची गरज नाही, बरोबर? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.” त्यानंतर महिला ग्राहकाने उत्तर दिलं की, “आम्हाला कोणत्याही राष्ट्रीय भाषेची गरज नाही, आम्हाला आमच्या भाषेची गरज आहे आणि कर्नाटकमध्ये आम्हाला कन्नडची गरज आहे. एकतर तुम्ही कन्नड गाणी वाजवा किंवा कोणतंच गाणं वाजवू नका.”

इथे पाहा व्हिडीओ:

https://fb.watch/8UQ0OnnUu8/

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वादाचा विषय बनला आणि नेटकरी या केएफसी कंपनीच्या बाजूने आणि विरोधात बोलू लागले. तर अनेकांनी केएफसीमध्ये जाणार नसल्याचं सांगत या ब्रँडला बायकॉट करण्याची मागणी सुरु केली. ट्विटरवर लोकांनी केएफसी संदर्भात वेगवेगळ्या पोस्ट, कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया दिल्या.

केएफसी कंपनीने दिलं हे स्पष्टीकऱण

सोशल मीडियावर वाढता वाद पाहून केएफसी कंपनीने स्वतः पुढे येत यावर सपष्टीकरण दिलंय. “KFC इंडिया हे पुन्हा सांगू इच्छित आहे की आम्ही सर्व संस्कृती आणि भाषांचा आदर करतो. देशाच्या कायद्याचा आदर करून, आम्ही देशातील रेस्टॉरंटमध्ये स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करतो. या ब्रँडचा बंगळुरूमध्ये २५ वर्षांचा दीर्घकालीन इतिहास आहे, कारण आपल्या कंपनीचा संपूर्ण भारतापर्यंतचा प्रवास बेंगळुरूमधल्या पहिल्या KFC रेस्टॉरंटमधून सुरू केला आहे.” असं त्यांनी या स्पष्टीकरणात म्हटलंय.

यापुढे स्पष्टीकरण देताना केएफसीने म्हटलं की, “सध्या आमच्याकडे एक कॉमन प्ले लिस्ट आहे जी परवानाकृत आहे आणि केंद्रीय पातळीवर विकत घेतलेली असते. ही प्ले लिस्ट देशभरातील रेस्टॉरंटमध्ये लावली जाते.”

कर्नाटकमध्ये घडलेल्या या प्रकारावर बोलताना त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटलं की, “गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही राज्यातील ७५ रेस्टॉरंटमध्ये १३०० हून अधिक टीम सदस्यांशी जिव्हाळ्याचे नाते संबंध निर्माण केले आहेत. कर्नाटक हे ब्रँडसाठी फोकस मार्केट बनले आहे कारण आम्ही पुढील काही वर्षांमध्ये इथे आमचा विस्तार वाढवण्याची योजना आखत आहोत. ग्राहकांना अखंड सेवा देण्याच्या उद्देशाने आम्ही राज्यातील आमच्या ग्राहकांसाठी इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये सेवा विस्तारित करतो, मग ती आमच्या रेस्टॉरंटमध्ये असोत किंवा सामाजिक, डिजिटल आणि प्रिंट माध्यमांद्वारे जाहिराती असोत.”