Khandeshi Old man Viral Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना डान्स करायला आवडतो. तरुणांबरोबर आता वयोवृद्ध लोकंही सोशल मीडियावर सक्रिय दिसतात आणि नवनवीन व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा मनसोक्त डान्स करताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. (an old man amazing dance video viral on social media wearing Maharashtrian clothes dhoti Sadara and topi)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजोबा रस्त्यावर उभे आहेत. आणि त्यांच्या शेजारी काही लहान मुले आणि तरुण मुले उभे आहेत. पुढे व्हिडीओ असे काही घडते की तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. आजोबा थेट नाचायला लागतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा मनसोक्त दिलखुलासपणे नाचत आहे. नाचण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरे धोतर आणि पांढरा सदरा घातला आहे. मराठमोळ्या आजोबांचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांची ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल.

The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
little girl did a great dance on the song Gutar Gutar
‘याला म्हणतात डान्स’… ‘गुटर्रSS गुटर्रS’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Funny video 5 year old child lodges fir against father in dhar video viral
VIDEO: “पप्पांना जेलमध्ये टाका” ५ वर्षाच्या चिमुकला थेट पोलिसांकडे गेला; तक्रार ऐकून पोट धरुन हसाल

हेही वाचा : कंगाल पाकिस्तानातील लोकांनी झपाट्याने वजन घटविण्यासाठी सुचविला अनोखा मार्ग; Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : नाद खुळा! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गावच्या यात्रेतील डीजेवर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘शाळा असावी तर…”

vanraj_chauvan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या आजोबांचे नाव वनराज चव्हान आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वत:ची ओळख खानदेशी काका म्हणून सांगितली आहे. इन्स्टाग्रामवर ते नवनवीन रिल्स आणि डान्सचे व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक लाइक्सचा वर्षाव करतात. विशेष म्हणजे त्यांना इन्स्टाग्रामवर हजारो लोक फॉलो करतात.

सोशल मीडियावर असे अनेक वृद्ध लोक आवडीने डान्स करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका आजोबांचा असाच एक डान्स व्हिडीओ चर्चेत आला होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ते आजोबा खुल्या मैदानावर बिनधास्त डान्स करताना दिसले होते. ते व्हिडीओमध्ये डान्सचा आनंद लुटताना दिसत होते. त्यांच्या आजुबाजूला अनेक वयोवृद्ध मंडळी सुद्धा होती. ती लोक सुद्धा आजोबांबरोबर डान्स करत त्यांना प्रोत्साहन देत आहे. त्या आजोबांनी “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” या गाण्यावर डान्स केला होता. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही त्यांचे चाहते होईल,इतका सुंदर डान्स त्यांनी केला होता.