रशियातही 'पुष्पा' फिव्हर, 'सामी सामी' गाण्यावर रशियन महिला थिरकली, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral | Loksatta

रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral

सोशल मीडियावर एका रशियन महिलेचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
पुष्पा सिनेमाच्या सामी सामी गाण्यावर रशियन महिला थिरकली. (image-social media)


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान स्टारर पुष्पा द राईज सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमावला. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं संपूर्ण देशभरात प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता आनंदाची बातमी म्हणजे रशियात राहणाऱ्या भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांनांही हा सिनेमा पाहता येणार आहे. कारण नुकतंच निर्मात्यांनी या सिनेमाच्या मॉस्कोमधील प्रमोशनाचे फोटो शेअर केले आहेत. एकीकडे सिनेमाचं प्रमोशन सुरु असताना दुसरीकडे मात्र रशियन नागरिकांना पुष्पा सिनेमातील गाण्यांचा फिव्हर प्रदर्शनापूर्वीच चढला आहे. कारण सोशल मीडियावर रशियन महिलांचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. रशियन महिलांनी लहान मुलांसोबत पुष्पा सिनेमातील सामी सामी गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले आहेत.

पुष्पा सिनेमा भारतात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेचाहत्यांना या सिनेमाच्या डायलॉग्सचं आणि गाण्याचं प्रचंड वेड लागलं. अल्लू अर्जुनने गाण्यांवर केलेल्या अफलातून स्टेप्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. सुपरहिट गाणे, अल्लू अर्जूनची जबरदस्त स्टाईल चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनली आहे. कारण पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली, सामी सामी गाण्यानं बॉक्स ऑफिसवर धुडगूस घातला. लाखो सिनेचाहत्यांना या गाण्यातील डान्सही आवडला. अनेकांनी या गाण्यांवर जबरदस्त ठुमके लगावत रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचंही समोर आलं. आता भारतातच नाही तर रशियातही पुष्पा सिनेमाच्या गाण्यांचा बोलबोला सुरु झाला आहे.

नक्की वाचा – Viral Video: 114 kmph वेगानं दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, दुभाजकाला धडक दिल्याचा थरार कॅमेरात झाला कैद

इथे पाहा व्हिडीओ

कारण रशियन महिलांनाही पुष्पा सिनेमातील गाण्यांवर डान्स करायला आवडलं आहे. रशियन महिला चिमुकल्यांसोबत सामी सामी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ मॉस्कोच्या ऐतिहासिक संग्रहालयात चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ Natalia Odegova नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळपास १७ हजार व्यूज मिळाले आहेत. रशियन महिला आणि चिमुकल्यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:43 IST
Next Story
१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का