नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय. अवघ्या महिन्याभरात १३ कोटींहून अधिक व्हूज मिळालेल्या स्क्विड गेमची एक वेगळीच क्रेझ सुरू झाली आहे. आता जगभरात या सीरिजची चर्चा सुरूये. आता नायजेरियन लोकांना देखील या स्क्विड गेमची भूरळ पडली आहे. ‘स्क्विड गेम’ सीरिजची हुबेहूब नक्कल केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नायजेरियन लोकांनी तयार केलेला हा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतील पडताना दिसून येत आहे.

‘इकोरोडू बॉईज’ नावाच्या नायजेरियन कॉमेडी ग्रुपने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय. हूबेहूब स्क्विड गेमची नक्कल केलेल्या या व्हिडीओने आता लोकांमध्ये खळबळ माजली आहे. ‘स्क्विड गेम’ची नायजेरियअन व्हर्जन या व्हिडीओमधून पहायला मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, स्क्विड गेममधील पात्रांप्रमाणेच ‘इकोरोडू बॉईज’ची मुलं-मुली सीन क्रिएट करताना दिसून येत आहेत. ‘स्क्विड गेम’मध्ये जे जे सीन दाखवण्यात आले आहेत, अगदी त्याप्रमाणेच या मुलांनी सीन क्रिएट केले आहेत. यातील मुला-मुलींचे हावभाव पाहून एका मिनिटांसाठी आपण जणू काही ‘स्क्विट गेम’च पाहत असल्याचा भास होतो. हा व्हिडीओ सर्वाचंच मनोरंजन करणारा ठरतोय. ही मूळ दक्षिण कोरियन वेबसिरीज असली तरी नायजेरियअन व्हर्जन केली तर कशी असेल, याचा अंदाज नेटिझन्सनी लावण्यास सुरूवात केलीय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रत्येक दृश्य अतिशय उत्तमरित्या दाखवले गेले आहे. या सीरिजशी संबंधित थ्रिलर किंवा सस्पेन्स या व्हिडीओमध्ये अगदी तसाच ठेवलाय, जसा मुळ सीरिजमध्ये दाखवण्यात आलाय. इकोरोडू बॉईज’च्या प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलेला आहे.

‘इकोरोडू बॉईज’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरूवात झालीय. या व्हायरल व्हिडीओने ‘स्क्विड गेम’ या सीरिजच्या लोकप्रियतेत आणखी नवी भर टाकलीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. दोन दिवसांपूर्व हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अवघ्या दोन दिवसांतच या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. त्याचप्रमाणे ‘इकोरोडू बॉईज’ने ग्रूपने केलेला हा प्रयत्न पाहून या व्हिडीओवरील कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसतोय.

नेमकं काय आहे ‘स्क्विड गेम’?

ही एक दक्षिण कोरियन सिरीज असून हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये एकूण नऊ एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड अर्धा ते एक तासाचा आहे. या सीरिजमधील मुख्य पात्र ही खूप कठीण काळातून जात आहेत. या सर्वांवर खूप मोठे कर्ज आहे. तरी या सर्वांचे आयुष्य बदलण्याकरिता त्यांना एका गेम खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते. हा गेम जो कोणी जिंकेल त्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याईतके पैसे मिळतील. पण हा जो कोणी हरेल, तो मृत्यूला प्राप्त होईल. तरीही गरिबी दूर करण्यासाठी या सिरीज मधील सीरिजमधील काही मुख्य पात्र हा गेम खेळण्याचे आमंत्रण स्विकार करतात.

ही सिरीज वीक माइंडेड लोकांसाठी नाही. यात प्रचंड प्रमाणात हिंसा आहे. जी बघितल्यावर कदाचित तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. पण जर तुम्ही थ्रिलर, सस्पेन्स, ट्विस्ट आणि ॲक्शन या कॅटेगरीचे चाहते असाल, तर नक्कीच ही सिरीज बघण्यासारखी आहे. यातील गेम हा बिग बॉस टाइप आहे पण हा खेळ बाहेरच्या जगासाठी नाही. तसेच यातील खलनायक कोण आहे हे तुम्हाला सिरीज मध्येच पहावे लागेल.