scorecardresearch

ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलांनी तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून डोळे पाणावतील

मुलांनी कित्येक वर्षांचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केल…VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील

Kids surprising their dad with his dream car emotional video viral
मुलांनी वडिलांना दिल सरप्राईज

Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर डोळ्यात टचकन पाणी येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधल्या वडिलांना त्यांच्या मुलाने असं काही सरप्राईज गिफ्ट दिलं की त्यांच्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं. आपली मुलं आणि कुटूंब हा अऩेकांसाठी वीक पॉइंट असतो.

वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. अशाच एका तरुणानं त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे.या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत.

Son Gifts Dad his dream car proud movement emotional video Viral trending today
ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलानं तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील
kavita lad
“माझी हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड यांनी सांगितली खऱ्या आयुष्यातील त्यांच्या लग्नाची खास आठवण
6 year old daughter shocking gift for dad
“स्वतःला गोळी…” ६ वर्षाच्या मुलीने वडिलांना दिलं विचित्र गिफ्ट, बंदुकीच्या गोळीखाली लिहिलं असं काही वाचून पालक झाले थक्क
dev aanand
देव आनंद यांचा जुहूतील ७३ वर्षीय जुना बंगला विकला? दिवंगत अभिनेत्याच्या पुतण्याने सांगितलं सत्य, म्हणाले…

या मुलाच्या वडिलांना कार चालवायला खूप आवडतं. त्यांना खूप वर्षांपासून त्यांची ड्रीम कार खरेदी करायची होती; मात्र त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहत होतं. त्यांच्या मुलाला हे माहीत होतं आणि त्यामुळेच त्यानं वडिलांना त्यांची ड्रीम कार सरप्राइज गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलं.त्यांना क्षणभर काहीच कळत नाही. त्यानंतर मुलगा त्यांना सांगतो की, ही कार तुमची आहे. यावेळी मात्र त्यांना अश्रू अनावर होतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण अन्…भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO व्हायरल

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Arhantt_pvt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होत वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kids surprising their dad with his dream car emotional video viral srk

First published on: 20-11-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×