Kiley Paul Viral Video: सोशल मीडियावर एखादं नवीन गाणं चर्चेत आलं की अनेक जण त्या गाण्यावर ठेका धरल्याशिवाय किंवा अभिनय केल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणं भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केले गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील चर्चेत असलेले ‘तौबा तौबा’ गाणेदेखील खूप लोकप्रिय झाले आहे. सध्या ‘काची सेरा’ हे तमिळ गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल अभिनय करताना दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर तमिळ भाषेतील ‘काची सेरा’ हे गाणं खूप चर्चेत आहे. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवत आहेत. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sai Pallavi Dances on marathi song Video viral
Video : “अप्सरा आली…”, मराठी गाण्यावर थिरकली दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी; बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
The baby was coddled by the cow Users are appreciating the video
‘आई कोणाचीही असो…’ गोठ्यात रडणाऱ्या चिमुकल्याबरोबर गाईनं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Viral Reel Shows Child Hanging As Mother Holds Her With One Hand While Posing Sitting On Well's Fence video
“अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘काची सेरा’ गाण्यावर ॲक्टिंग करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत. किली पॉलला या गाण्यावर अभिनय करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘तमिळ गाणं, आग्रहाखातर’, असे लिहिलेले दिसत आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ७० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: बापरे! रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा निष्काळजीपणा नडला; आरपीएफ जवान ठरला देवदूत, VIDEO सोशल मीडियावर चर्चेत

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किली, तुला सर्व भाषा कशा समजतात?”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सुंदर एक्स्प्रेशन”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तुला खूप खूप प्रेम”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “सुपर”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, किली पॉलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील ‘इल्युमिनाटी’ या गाण्यावरदेखील जबरदस्त डान्स केला होता. तसेच त्याने ‘गुलाबी साडी’ या गाण्यावरही सुंदर डान्स केला होता.