Kiley Paul’s Dance: सोशल मीडियावर सातत्याने विविध व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. बऱ्याचदा ट्रेंडिंग गाण्यांचीही चर्चा रंगलेली असते. त्यावर एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की, त्यातील डायलॉग्ज, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांच्या रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल.

काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत होते; तर दुसरीकडे ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ ही गाणी चर्चेत होती. या गाण्यांवर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील डान्स केल्याचे व्हिडीओ आपण पाहिले होते. दरम्यान, किली पॉलने आणखी एका नव्या ‘आज की रात’ या हिंदी गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओही सध्या खूप चर्चेत आहे.

Viral video Indian woman stuns Denmark crowd with her fiery dance to Shreya Ghoshal song singer reacts
डेनमार्कमध्ये ‘ऊ ला ला’ गाण्यावर भारतीय तरुणीने केला भन्नाट डान्स, थेट विद्या बालनला दिली टक्कर! Video होतोय Viral
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Nikki Tamboli dialogue Bai Kay Prakar dialogue goes viral
“बाईsss..काय प्रकार?” चिमुकल्यांनी केला निक्की तांबोळीच्या डायलॉगवर भन्नाट डान्स, Video एकदा पाहाच
problem of koyta attacks and traffic congestion on the roads in Pune is serious
पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?
Pune, Ganesh utsav 2024, Roadside romeos, action on Roadside romeos, harassment, women safety, pune police, police action, preventive measures, Rapid Action Force, crime prevention,
गणेशोत्सवात सडक सख्याहरींना चाप, सडक सख्याहरींची छायाचित्रे चौकात लावणार; पोलीस आयुक्तांचा इशारा
online betting apps marathi news
ऑनलाइन बेटिंग ॲप आता ईडीच्या रडारवर… १ लाख कोटींचा महसूल बुडवणाऱ्या बेटिंग ॲपच्या जाळ्यात आजही कित्येक का फसतात?
fairplay betting app case misuse of payment gateway for disbursement of betting amount
फेअरप्ले बेटिंग ॲप प्रकरणः सट्टेबाजीच्या रक्कम वितरणासाठी पेमेंट गेटवेचा गैरवापर; दिल्ली, नोएडा, मुंबई येथील ९ ठिकाणी ईडीचे छापे
loksatta Girish kuber article about maharashtra losing investment and start up
अन्यथा: घागर उताणी रे…!

किली पॉलचा डान्स व्हायरल

भारतातली विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने या गाण्यावरही रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘आज की रात’ गाण्यावर स्लो मोशनमध्ये डान्स करीत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून अनेक भारतीय युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘ट्रेंडिंग’ असे लिहिलेले दिसत आहे.

हेही वाचा: खतरनाक जुगाड! पठ्ठ्यानं चक्क पुस्तकात लपवल्या मद्याच्या बाटल्या; VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि २२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हा भाऊ मनाने भारतीय आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “एक नंबर भाऊ.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “भारी डान्स करतोस तू किली.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.”