एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशातील बॉलिवूड गाणी परदेशातील नागरिकांना आवडतात की नाही हे माहित पडत नसायचे. परंतु आता सोशल मीडियाच्या या युगात सर्वकाही एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. भारतातील लोकांमध्ये हिंदी गाण्यांसााठी जितकी क्रेझ आहे तितकीच क्रेझ परदेशातही आहे. याचा प्रत्यय देणारे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये विदेशी लोक हिंदी गाणी गाताना किंवा त्या गाण्यांवर नाचताना दिसतात. टांझानिया ब्रदर सिस्टर गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहेत. बॉलिवूडच्या हिंदी गाण्यांवर लिप-सिंक करून जगाला आपल्या जबरदस्त एक्सप्रेशन्सने वेड लावलं आहे. त्यांनी बॉलीवूड प्रेमींना आणि विशेषतः भारतातील लोकांना वेगवेगळ्या डान्स व्हिडीओंनी आपल्या प्रेमात पाडलं आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आता एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर  धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या टांझानियाच्या किली पॉलच्या नवीन व्हिडीओमध्ये तो सोनू निगमच्या ‘आओ सुनाऊं प्यार की एक कहानी’ या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. हे गाणं ‘क्रिश’ या सुपरहिट चित्रपटातील आहे, ज्यामध्ये अभिनेता हृतिक रोशनने या गाण्यात शानदार अभिनय केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की किली पॉलने नेहमीप्रमाणे त्याचा पारंपारिक आदिवासी पोशाख परिधान केला आहे आणि क्रिश चित्रपटाच्या गाण्यावर उत्कृष्ट लिप-सिंक करताना दिसत आहे. प्रत्येक वेळी प्रमाणेच या व्हिडीओमधले त्याचे एक्सप्रेशन आणि स्माईल अप्रतिम आहे. त्याचा हा नवा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा नवा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : हुंडा कमी दिला म्हणून नवरदेवाने लग्नाला दिला नकार, VIRAL VIDEO पाहून लोक संतप्त

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Russia-Ukraine War : युक्रेनच्या युद्धभूमीवरच केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

किली पॉलची बहीण नीमा पॉल हिच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ६ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. 
किली आणि नीमा पॉल अनेकदा बॉलीवूड गाण्यांवर लिप-सिंक करून किंवा डान्स करून व्हिडीओ बनवतात आणि ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात. या टांझानियन भावंडांचे प्रत्येक व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. भारतात या दोन भावा-बहिणींसाठी बरीच मोठी फॅन फॉलोइंग आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते.