Kanye West vs Elon Musk: अमेरिकन रॅपर ‘ये’ म्हणजेच पूर्वाश्रमीचा कान्ये वेस्ट याचे ट्विटर अकाउंट हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. २२ वेळा ग्रामी अवॉर्ड जिंकलेला व किम कार्देशीयनचा एक्स नवरा कान्ये वेस्ट यांचे अकाउंट निलंबित केल्यावर अनेकांनी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांना प्रश्न केले होते. यावर उत्तर देत आता मस्क यांनी कान्ये वेस्ट याने पोस्ट केलेल्या एका चिन्हांवरून संबंधित कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द हॉलीवूड रिपोर्टर’च्या अहवालानुसार कान्ये वेस्टने यापूर्वीही ट्विटरवर अनेक विवादास्पद ट्विट केले होते. ज्यात त्याने मस्कसह संभाषणातील काही मुद्देही शेअर केले होते. मात्र ज्या शेवटच्या ट्वीटवरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली ते कारण खास ठरत आहे. कान्ये वेस्टने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये स्टार ऑफ डेव्हिडच्या फोटोसह स्वस्तिक हे चिन्ह दिसून येत आहे. हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आले होते.

कान्ये वेस्टचे ट्विटर अकाउंट निलंबित होण्याबाबत एलॉन मस्क यांनी खुलासा करत सांगितले की, “मी माझ्या परीने प्रयत्न केले. त्याला अनेकदा सूचना देऊनही त्याने पुन्हा हिंसेला प्रोत्साहन देणारे ट्वीट केले, जे आमच्या नियमाचे उल्लंघन असल्याने आता खाते निलंबित करण्यात आले आहे.”, यापुढे गंमतीत स्पष्टीकरण देताना मस्क असेही म्हणाला की, “कान्येचे ट्विटर अकाउंट हे हिंसाचारास चिथावणी दिल्याबद्दल निलंबित केले जात आहे. त्याने पोस्ट केलेला माझा फोटो हे यासाठी कारण नाही उलट त्या फोटोने मला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिली होती.

एलॉन मस्क ट्वीट

दरम्यान, कान्ये वेस्ट याचे ट्विटर अकाउंट निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ ऑक्टोबरमध्ये असंवेदनशील ट्वीटमुळे कान्येच्या अकाउंटवर प्रतिबंध लावण्यात आला होता. केवळ ट्विटरच नव्हे तर इंस्टाग्राम अकाउंटसाठीही अशी कारवाई करण्यात आली होती.

दुसरीकडे कान्ये वेस्ट हे नाव अलीकडे किम कार्देशीयनसह घटस्फोटावरूनही चर्चेत आले आहे. अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कान्येने किमला दर महिन्याला २० लाख डॉलर्स देण्याच्या अटीसह त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. कान्ये वेस्ट येत्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतारण्याचीही शक्यता आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim kardashian ex husband kanye west suspension from twitter elon musk revels shocking reasons swastika controversy svs
First published on: 02-12-2022 at 14:14 IST